‘विघ्नहरा’च्या दर्शनाने नववर्षाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 02:28 AM2018-01-03T02:28:20+5:302018-01-03T02:28:43+5:30
नववर्षाच्या पहिल्या दिवशी अष्टविनायकातील प्रमुख स्थान श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनाने राज्य परराज्यातील हजारो भाविकांनी नव वर्षाचे स्वागत केले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी विघ्नहतर््याचे दर्शन घेतले की संपूर्ण वर्ष आनंदमय जाईल या भावनेने भविक येथे आले होते.
ओझर : नववर्षाच्या पहिल्या दिवशी अष्टविनायकातील प्रमुख स्थान श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनाने राज्य परराज्यातील हजारो भाविकांनी नव वर्षाचे स्वागत केले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी विघ्नहतर््याचे दर्शन घेतले की संपूर्ण वर्ष आनंदमय जाईल या भावनेने भविक येथे आले होते.
Þ वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था एकेरी वाहतूक करून अडथळा न होता पार्किंग करण्यात आले होते. कमी वेळेत दर्शनासाठी सभामंडपामध्ये दर्शनरांग ,कॅमेरे सुविधा करण्यात आली होती,अशी माहिती अध्यक्ष शाकुजी कवडे यांनी दिली. रात्री अकरा पर्यंत भविकांनी श्रींचे दर्शन घेतले. सकाळी साडेसात, दुपारी बारा व रात्री साडेदहाला भविकांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली.
श्रींच्या मंदिरालगत असलेला येडगाव धरणाचा जलाशय या जलाशयलगत उभे राहिल्यावर दृष्टिक्षेपात येणारा शिव जन्मभूमी शिवनेरी किल्ला,अष्टविनायकातील दुसरे स्थान असलेला गिरिजात्मज लेण्याद्री किल्ला, व नयनरम्य
परिसर तसेच येथील आल्हाददायक वातावरण, भिकारी मुक्त
तीर्थ क्षेत्र ,वाखाणण्या जोगी स्वच्छता ,देवस्थान पुरवित असलेल्या उच्च सुविधा यामुळे येथे भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.निवासासाठी अग्रक्रम देतात.