शिवनेरी ते पुरंदर पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 12:26 AM2019-01-07T00:26:33+5:302019-01-07T00:26:52+5:30
छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने, जय जय जय जय शिवाजी अशा आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या घोषणांनी आज मंचर शहर निनादून गेले.
मंचर : छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने, जय जय जय जय शिवाजी अशा आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या घोषणांनी आज मंचर शहर निनादून गेले. निमित्त होते ते स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आयोजित किल्ले शिवनेरी ते किल्ले पुरंदर पालखी सोहळ्याच्या मंचर शहरातील आगमनाचे.
दुपारी कळंब येथे पालखीचे स्वागत सभापती उषा कानडे, माजी सभापती वसंतराव भालेराव, सरपंच राजश्री भालेराव, मनीषा कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. मंचर शहरात पालखीची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंच दत्ता गांजाळे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, अरुण गिरे, सुरेश भोर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कैलास बाणखेले, अरुण नाना बाणखेले, बाजीराव मोरडे, महेश थोरात, दिलीप पवळे, बाबाजी चासकर, बाबु थोरात, गणेश बाणखेले, रंगनाथ थोरात , संदिप शेवाळे आदींसह नागरीक मोठ्या संख्येने स्वागताला उपस्थित होते.
शिवचरित्र व शंभुचरित्र कथाकार ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांच्या संकल्पनेतून स्वराज्य संघ महाराष्टÑ राज्य यांच्या वतीने किल्ले शिवनेरी ते किल्ले पुरंदर छत्रपती शिवाजीराजे-शंभूराजे भेट पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. किल्ले शिवनेरी येथून पालखीचे प्रस्थान होते. मंचर येथे पालखीची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी तुतारीधारी अग्रभागी होते. पारंपरिक वेशातील मावळे आणि युवकांचा जल्लोष अशा वातावरणात मिरवणूक पार पडल्यानंतर पालखी पुन्हा पुरंदरकडे मार्गस्थ झाली.