वरवंड आषाढीवारी अंतर्गत हरितवारी वृक्षारोपण उपक्रमाचे वरवंडमध्ये स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:36+5:302021-07-17T04:09:36+5:30
वरवंडमध्ये स्वागत करण्यात आले. संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज तथा धर्माचार्य परिषदेचे अध्यक्ष तसेच पंढरपूर येथील ...
वरवंडमध्ये स्वागत करण्यात आले. संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज तथा धर्माचार्य परिषदेचे अध्यक्ष तसेच पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे विश्वस्थ हभप शिवाजीराव मोरे महाराज यांच्या संकल्पनेतून हरितवारीचे नियोजन करण्यात आले आहे.
हभप शिवाजीराव मोरे महाराज यांच्या संकल्पनेतून आषाढी हरित वारीचे या उपक्रमाचे आयोजन केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ज्या-ज्या गावी मुक्कामी असतो, त्या गावामध्ये पालखी सोहळ्याच्या निमित्ताने १० मोठी झाडे लावून पालखी सोहळा मार्गातील गावे हरित करण्याचा मनोदय आहे.
या हरित वारीचे स्वागत वरवंड गावचे उपसरपंच प्रदीप दिवेकर यांनी स्वागत केले. पालखीतळ परिसरात ही झाडे लावून जतन करू, असे आश्वासन दिले.
हरित वारीचे संपर्कप्रमुख युवराज कुलकर्णी, विशाल वेदपाठक, राजेंद्र हजगुडे, कृष्णा व्यवहारे, नीलेश निरवले या हरितवारीचे स्वागत व सत्कार करून पालखीतळ परिसरात दिलेली दहा झाडे लावून ती जतन करण्याचे आश्वासन देण्यात आले.
प्रेमनाथ दिवेकर, सुभाष फासगे, व गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १६वरवंड आषाढीवारी अंतर्गत
फोटो ओळी : हरितवारीचे स्वागत करताना ग्रामस्थ