सनईवादनाने होणार मतदारांचे स्वागत

By Admin | Published: February 21, 2017 01:56 AM2017-02-21T01:56:20+5:302017-02-21T02:34:25+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाच्या

Welcome to the voters of Sunnyashan | सनईवादनाने होणार मतदारांचे स्वागत

सनईवादनाने होणार मतदारांचे स्वागत

googlenewsNext

बारामती : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बारामती तालुक्यात २० आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामधील सुपा मतदान केंद्र पोपटी व काटेवाडी मतदान केंद्र गुलाबी रंगाच्या रंगसंगतीनुसार मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी विशेष रंगसंगतीने सजविण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी दिवसभर पारंपरिक पद्धतीने सनईवादनाने मतदारांचे स्वागत करण्यात येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. या लोकशाही प्रक्रियेला बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करणे आवश्यक आहे. निवडणुक प्रक्रियेतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच नवमतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आदर्श मतदान केंद्राची संकल्पना राज्य निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत तालुक्यातील सुपा मतदान केंद्रासाठी पोपटी व काटेवाडी मतदान केंद्रासाठी गुलाबी रंगाची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही मतदान केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राध्यक्षासह मतदान केंद्र अधिकारी १ ते ४ महिलाच असणार आहेत. तसेच मदतनीस शिपाई व पोलीसही महिलाच असणार आहेत. महिला पोलीस वगळता सर्व कर्मचारी केंद्राने निवडलेल्या रंगसंगतीचा पोषाख परिधान करणार आहेत. तसेच या मतदान केंद्रात केंद्रासाठी निवडलेल्या रंगाचे पताके, फुगे लावण्यात येणार आहेत.
येणाऱ्या मतदारांचे फुले देऊन स्वागत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही मतदान केंद्राच्या आवारात मतदारांना सावलीची व्यवस्था, मधुर संगीताची व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याचे थंड पाणी, कचराकुंडी, अग्निशमन यंत्रणा, रूम फ्रेशनर, वृद्ध अपंगांसाठी मतदान केंद्रावर बैठकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. नारळाची पाने, केळीचे खुंट या ठिकाणी लावण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांची एका रंगाची वेशभूषा
सुपा आणि काटेवाडी या दोन्ही मतदान केंद्रासह तालुक्यातील इतर १९ मतदार केंद्रे ही आदर्श मतदार केंद्रे म्हणून स्थापित करण्यात आली आहेत. त्यामध्ये शिवनगर, माळेगाव बु, पणदरे, मानप्पावस्ती, कोऱ्हाळे, वडगाव निंबाळकर, आठ फाटा, सोरटेवाडी, सोमेश्वरनगर, निंबुत, मुर्टी, मोरगाव, मेडद, डोर्लेवाडी, शिरवली, सांगवी, नीरावागज, काऱ्हाटी, वढाणे, देऊळगाव रसाळ, शिर्सुफळ, पारवडी, पाहुणेवाडी, चिरेखानवाडी या मतदान केंद्रांचा परिसर स्वच्छ ठेवण्यात येणार आहे. सुपा आणि काटेवाडी मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र करण्यासाठी भूमी अभिलेख उपाधीक्षक अमरसिंह पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता व्ही. एम. ओहळ, राजेंद्र शितोळे, शाखा अभियंता जयंत काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

मतदान साहित्य केंद्रावर
नेरे : भोर तालुका पंचायत समितीच्या सहा गणासाठी व तीन जिल्हा परिषद गटासाठी उद्या मंगळवारी मतदान होत आहे. यासाठी भोर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत-आयटीआय येथे कर्मचाऱ्यांना मतदानाचे साहित्य सोमवारी दि. २० सकाळी १० वाजता देण्यात आले़ या वेळी येथे १ हजार १७६ कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी लागणारी वाहतूक यंत्रणा सज्ज असल्याचे व मतदान यंत्र तपासून घेताना.

Web Title: Welcome to the voters of Sunnyashan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.