भारतीय वेदशास्त्रात प्राणिमात्रांचे कल्याण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:17 AM2021-02-18T04:17:51+5:302021-02-18T04:17:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आपल्या सुखकर आयुष्याला उपयोगी पडेल अशी देणगी म्हणजे वेद आहेत. आज जगात वेदावर संशोधन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “आपल्या सुखकर आयुष्याला उपयोगी पडेल अशी देणगी म्हणजे वेद आहेत. आज जगात वेदावर संशोधन होत आहे. परंतु, आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. सुखकर जीवनासाठी संस्कार गरजेचे असतात. वेदात वर्णिलेले संस्कार फक्त भारतामध्येच दिसून येतात. सर्व प्राणिमात्रांचे कल्याण चिंतणाऱ्या वेदशास्त्राचे महत्त्व कायम राहील,” असे मत करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याभारती सरस्वती यांनी व्यक्त केले.
कसब्यातील नवग्रह मित्र मंडळाच्या ७१ व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा आणि कोरोना योद्धांच्या सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मुक्ता टिळक, फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, नायडू हॉस्पिटलचे डॉ. विवेकानंद जाधव, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, मंडळाचे अध्यक्ष मानसिंग पाटोळे आदी या वेळी उपस्थित होते. इंदिरा पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले.