जीवरक्षक झोपले होते काय? पिंपरी महापालिकेच्या जलतरण तलावत बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 19:04 IST2023-05-17T19:03:54+5:302023-05-17T19:04:09+5:30
पोलिसांनी जलतरण तलावातील जीवरक्षक तसेच तसेच तलावावर नियंत्रण ठेवणाऱ्या इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल केला

जीवरक्षक झोपले होते काय? पिंपरी महापालिकेच्या जलतरण तलावत बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू
पिंपरी : महापालिकेच्या चिखलीतील संभाजीनगर येथील साईॲक्वा जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव राहुल मानतप्पा वाघमोडे असे आहे. ही घटना मंगळवारी (दि.१६) दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी सुरज मलिक्काअर्जून वाघमोडे (वय २९, रा. देहुरोड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जलतरण तलावातील जीवरक्षक तसेच तसेच तलावावर नियंत्रण ठेवणाऱ्या इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हा आपल्या मित्रांसोबत संभाजीनगर येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. तो जलतरण तलावात बुडाला. मित्रांना राहुल दिसत नसल्याने त्यांनी आरडाओरडा केली. जलतरण तलावावर नियंत्रण ठेवणाऱ्या जबाबदार व्यक्ती तसेच जीवरक्षक यांच्या हलगर्जी आणि निष्काळजीपणामुळे राहुल याचा बुडून मृत्यू झाल्याची फिर्याद राहुलचा चुलत भाऊ सुरज याने चिखली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.