पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सरासरी गाठणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:34+5:302021-06-02T04:10:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (राहुरी) कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (राहुरी) कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी त्यांचा अंदाज मंगळवारी (दि. १) जाहीर केला. महाराष्ट्रात सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर मॉन्सून अंदाज आधारित आहे, असे डॉ. साबळेे यांनी स्पष्ट केले. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. कमी दिवसांत जास्त पाऊस आणि काही काळ दोन पावसात मोठे खंड असे यंदाच्या पावसाळ्यात घडेल, असा अंदाज त्यांनी दिला.
डॉ. साबळे म्हणाले की, जून, जुलै महिन्यात अकोला (पश्चिम विदर्भ), पाडेगाव (पश्चिम महाराष्ट्र), निफाड (नाशिक) येथे पावसात मोठे खंड पडण्याची शक्यता आहे. दापोली (कोकण), पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर (मध्य व पश्चिम महाराष्ट्र) धुळे, जळगाव (खान्देश) आणि परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे.
चौकट (आकडे मिलिमीटर)
असा पडेल पाऊस
विभाग सरासरी पावसाचा अंदाज
कोल्हापूर ७०६ ७०६
कराड ५७० ५७०
पाडेगाव ३६० ३५०
सोलापूर ५४३ ५४०
राहुरी ४०६ ३९८
पुणे ५६६ ५५४