येणाऱ्या पिढीला काय उत्तरे द्यायची? : योगेश पिंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:03+5:302021-06-04T04:10:03+5:30
पुणे : ओबीसींचे राजकीय आरक्षण या महाविकास आघाडी सरकारने काढून घेतले आहे. राज्यात ५२ टक्के ओबीसी समाज आहे. बारा ...
पुणे : ओबीसींचे राजकीय आरक्षण या महाविकास आघाडी सरकारने काढून घेतले आहे. राज्यात ५२ टक्के ओबीसी समाज आहे. बारा बलुतेदारांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले. मात्र या सरकारने या समाजाला वाऱ्यावर सोडले आहे. येणाऱ्या पिढीला आम्ही काय उत्तरे देऊ, हा मोठा प्रश्न आहे. समाजाचे हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी लढा सुरू ठेवला असल्याचे भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहरचे अध्यक्ष योगेश पिंगळे यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चातर्फे गुरुवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘बोंबाबोंब आंदोलन’ केले. त्या वेळी ते बोलत होते. भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, उमा खापरे, वर्षा डहाळे, अनुप सूर्यवंशी, धनंजय जाधव आदी या वेळी उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला आघाडी सरकारचे अपयश कारणीभूत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. मराठा आरक्षण, पदोन्नतीबाबत सरकार ढिम्म आहे. या सरकारमधील ओबीसी नेते मूग गिळून गप्प बसलेले आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.