७० वर्षात काँग्रेसने केले नाही, ते ९ वर्षात मोदी सरकारने केले - जे. पी. नड्डा

By राजू इनामदार | Published: May 18, 2023 05:24 PM2023-05-18T17:24:29+5:302023-05-18T17:24:55+5:30

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाले

What Congress did not do in 70 years, Modi government did in 9 years - J. P. Nadda | ७० वर्षात काँग्रेसने केले नाही, ते ९ वर्षात मोदी सरकारने केले - जे. पी. नड्डा

७० वर्षात काँग्रेसने केले नाही, ते ९ वर्षात मोदी सरकारने केले - जे. पी. नड्डा

googlenewsNext

पुणे: काँग्रेसच्या लोकांनी लिहिणे वाचणे सोडून दिले आहे, म्हणून त्यांना कळत नाही, पण नरेंद्र मोदींमुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढली व मोदी भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. ७० वर्षात काँग्रेसने केले नाही ते ९ वर्षात मोदी सरकारने केले असे ते म्हणाले.

बालगंधर्व रंगमंदिरात गुरूवारी झालेल्या या बैठकीला ऊपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार, विनोद तावडे , ऊपस्थित होते. 

नड्डा म्हणाले, जगातील ३ र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारताची आहे. मोबाईल ऊत्पादन भारत पुढे. रेल्वे, रस्ते अशा सर्व क्षेत्रात पुढे. कोरोनाची मार सर्व जगाला बसला. पण भारताला नाही. कारण मोदींनी संकटाला संधी मानले. राज्य सरकारच्या कामाचेही मोदी यांनी कौतूक केले. मविआ सरकारच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली.

ऊपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उसने बळ घेऊन वाघ बनता येत नाही. त्यासाठी स्वतःची ताकद लागते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तरी त्यांना जाग येईल असे वाटले होते. तसे झालेले नाही उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही मागण्या न्यायालयाने मान्य केल्या नाहीत. तरी म्हणतात गावोगाव निकाल सांगू. बडवा! आमच्या बापाचे काय जाते! सरकार पूर्ण घटनात्मक आहे. कार्यकाळ तर पूर्ण करेलच, शिवाय पून्हा निवडून येईल. 

ठाकरे यांच्याबरोबरच फडणवीस यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केले. टीआरपी कसा खेचावा यासाठी त्यांचा क्लास लावावा. स्वतःच्या पक्षाचा स्वतःच राजीनामा दिला. लोक माझे सांगाती मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे काय होते ते सांगितले आहे. नान पटोले यांना अँवार्ड द्यायला हवे. ते म्हणतात वाझेला मीच स्फोटके ठेवायला सांगितले. वाझेंना पोलिस सेवेत घेण्यासाठी ठाकरेच सर्वाधिक आग्रही होते.

Web Title: What Congress did not do in 70 years, Modi government did in 9 years - J. P. Nadda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.