धनगर समाजाची फसवणूक करतायत की काय? गणपतराव देशमुख यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 08:12 PM2018-05-28T20:12:40+5:302018-05-28T20:12:40+5:30

उरलेले आयुष्य राज्यातील दुष्काळ हटवण्यासाठी आणि धनगर आरक्षण मिळण्याच्या प्रश्नासाठी : आमदार गणपतराव देशमुख

What is deceiving Dhangar society? Ganpatrao Deshmukh | धनगर समाजाची फसवणूक करतायत की काय? गणपतराव देशमुख यांची खंत

धनगर समाजाची फसवणूक करतायत की काय? गणपतराव देशमुख यांची खंत

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवार वाड्यावर ‘धनगर माझा सन्मान सोहळा’ धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही

पुणे : कारण नसताना मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ नेत्याने कायद्यात दुरुस्ती न करता सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. यावर जास्त टिप्पणी करणार नाही; मात्र, धनगर समाजाची फसवणूक करतात की काय अशी शंका येत असल्याची खंत ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केली. तसेच उरलेले आयुष्य राज्यातील दुष्काळ हटवण्यासाठी आणि धनगर आरक्षण मिळण्याच्या प्रश्नासाठी आहे. यासाठी जे काही करावे लागेल ते करेल, असेही ते म्हणाले.
पुणे येथील ऐतिहासिक अशा शनिवारवाडा पटांगणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जयंती व धनगर माझाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ‘धनगर माझा सन्मान सोहळा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशमुख यांना ‘धनगर माझा जीवन गौरव पुरस्कार’देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते.  
या वेळी जलसंधारण तथा राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे ,आमदार रामराव वडकूते, अ‍ॅड. रामहरी रूपनवर, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी आमदार पोपटराव गावडे, गोपीचंद पडळकर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उत्तम जानकर, यशवंत सेनेचे माधव गडदे, आॅल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रवीण काकडे, ज्येष्ठ पत्रकार शामसुंदर सोन्नर,  प्रा. शिवाजी दळणर, राजू दुर्गे, घनशाम हाके, रासपाचे बाळासाहेब दोलताडे, उज्ज्वला हाके, अर्जुन सलगर, तुकाराम काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराने मी भारावून गेलो आहे. हा सन्मान माझा नसून, दुष्काळी भागातील जनतेने दिलेल्या आशीर्वादाचा सत्कार आहे, अशी भावना देशमुख यांनी व्यक्त केली. धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय राहाणार नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 
पुणे व पिंपरी-चिंचवड एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग पोळे, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त संगीता धायगुडे, उद्योजक रमेशशेठ लबडे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, भूमापन क्षेत्र अधिकारी अनिल विष्णू राऊत, जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहूजी शेवाळे, युवा उद्योजक मारुती दिगंबर येडगे, सुधाई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुनील कुºहाडे, ईश्वरकृपा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा साधना संभाजी गावडे या सर्वांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जयश्री श्रावण वाकसे व युवा उद्योजक विवेक बिडगर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. धनगर माझाचे संपादक धनंजय तानले यांनी प्रास्ताविक, तर गणेश खामगळ यांनी आभार मानले.

Web Title: What is deceiving Dhangar society? Ganpatrao Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.