वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'हर हर महादेव' चित्रपटावर काय म्हणाले बाजीप्रभुंचे वंशज?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 06:02 PM2022-11-16T18:02:45+5:302022-11-16T18:04:24+5:30
नेमकं कशावर या वंशाजांनी आक्षेप घेतला ते व्हिडिओतून जाणून घ्या...
पुणे : सध्या कोणताही ऐतिहासिक चित्रपच आला आणि त्याच्यावरून वाद झाला नाही, असं कदाचित घडतं. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'हर हर महादेव' या चित्रपटावरून मोठा वादंग सुरू आहे. हा चित्रपट बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप, संभाजी ब्रिगेडसह इतर संघटनांनी केला आहे. यावर बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशजांनी पहिल्यांदाच माध्यमासमोर येऊन प्रतिक्रिया दिली. नेमकं कशावर या वंशाजांनी आक्षेप घेतला ते व्हिडिओतून जाणून घ्या.
आक्षेप घेतलेले मुद्दे-
- काल्पनिक दृष्ये चुकीचे दाखवली
- बाजीप्रभुंनी लढवलेली पावनखिंड चुकीची दाखवली आहे.
- अफजलखानाच्या वधानंतर बाजीप्रभुंची उपस्थिती यावरही प्रश्नचिन्ह आहे.
- सिनेमॅटीक लिबर्टीचा अयोग्य वापर
- महाराजांचा एकेरी उल्लेख चुकीचा
- बाजीप्रभुंच्या मुलांचा इतिहास व्यवस्थित दाखवला गेला नाही.
- बाजीप्रभुंच्या गावातील चित्रपटात शुटींग नाही
- भावनिक व्यक्तीरेखा दाखवणे अयोग.
- निर्माते किंवा दिग्दर्शक यांनी अजूनही संपर्क साधला नाही.