चंद्रकांत पाटील यांनी पुण्यासाठी काय केले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:00+5:302021-05-11T04:11:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोरोना काळात काय दिवे लावले असा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोरोना काळात काय दिवे लावले असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला. शहराचे खासदार गिरीष बापट यांना अडगळीत टाकले असले तरी पालिकेची सर्व यंत्रणा ताब्यात असलेलया आणि मोदी-शहा यांच्याशी मधुर संबंध असलेल्या पाटील यांनी पुण्यासाठी काय केले हे सांगावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. १०) पालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक विशाल तांबे, बाबुराव चांदेरे, गणेश ढोरे, अश्विनी कदम, प्रिया गदादे उपस्थित होत्या.
जगताप म्हणाले, भाजपच्या अनेक नगरसेवकांनी लसीकरण केंद्रांचा ताबा घेतला असून, महापालिकेची यंत्रणा सत्ताधारी पक्षाने हायजॅक केली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.