कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची माहिती असताना राज्य सरकारने काय केले : माधव भांडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:11 AM2021-04-24T04:11:51+5:302021-04-24T04:11:51+5:30

पुणे : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा खाली गेला असला तरी दुसऱ्या लाटेचा धोका आहे़,असा अंदाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...

What did the state government do when it came to know about the second wave of corona: Madhav Bhandari | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची माहिती असताना राज्य सरकारने काय केले : माधव भांडारी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची माहिती असताना राज्य सरकारने काय केले : माधव भांडारी

Next

पुणे : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा खाली गेला असला तरी दुसऱ्या लाटेचा धोका आहे़,असा अंदाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०२० मध्येच वर्तविला होता़ पण या लाटेची माहिती असतानाही, त्याला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने गेल्या पाच महिन्यांत काय तयारी केली हे जनतेला सांगावे, अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकारांशी बोलताना केली़

भांडारी म्हणाले, गेल्या वर्षी राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ नोव्हेंबर २० रोजी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला होता. त्या वेळी त्यांनी जनतेने सहकार्य केले म्हणून कोरोना रुग्णांचा फुगत चाललेला आकडा जरूर खाली आणला पण कोरोनाचे संकट संपले असू समजू नका असेही सांगितले होते़ पाश्चात्य देशांचा विचार केला तर दुसरी तिसरी लाट येते आहे. पहिल्या लाटेशी तुलना केली तर ही लाट सुनामी आहे की काय, अशी भीती वाटते. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली भीती पाच महिन्यांनी महाराष्ट्रात शब्दश: खरी ठरली आहे़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अचूक अंदाज होता हे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसते. त्यामुळेच, इतकी पूर्वकल्पना असताना गेल्या पाच महिन्यांत राज्य सरकारने दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काय तयारी केली याची माहिती आता जनतेला दिली पाहिजे.

नोव्हेंबर महिन्यातच राज्यातील सर्व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आॅक्सिजन प्लँटचे काम सुरू केले असते, तर आज संकटाच्या वेळी आॅक्सिजनसाठी अशी तडफड करावी लागली नसती आणि इतर राज्यांसमोर हातही पसरावा लागला नसता. कोरोनावरील उपचारात रेमडेसिविरचा उपयोग होतो हे गेल्या वर्षी पहिल्या लाटेतच लक्षात आले होते. हे लक्षात घेऊन गेल्या पाच महिन्यांत रेमडेसिविर उपलब्ध करून घेण्यासाठीही पुरेशी तयारी राज्य शासनाला करता आली असती, असेही ते म्हणाले़

-------------------------------------------

Web Title: What did the state government do when it came to know about the second wave of corona: Madhav Bhandari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.