बँकामधील गर्दीचे करायचे काय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:10 AM2021-05-06T04:10:56+5:302021-05-06T04:10:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. काही ठिकाणी गर्दीवर नियंत्रण मिळविले देखील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. काही ठिकाणी गर्दीवर नियंत्रण मिळविले देखील गेले आहे. मात्र, याला बँका अपवाद ठरत आहे. बँकामध्ये खातेदारांची होणारी गर्दी हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.
सर्वच बँकांनी आपल्या कामकाजाची वेळ सकाळी १० ते दुपारी २ ही ठेवली आहे. लवकरात लवकरात कामे संपवून घरी जाता यावे यासाठी काही खातेदार बँक उघडण्याच्या आधीच आलेले असतात. पुण्यातील बहुतांश बँकेत सकाळी १० ते १२ या वेळेत गर्दी होताना दिसून येत आहे. आतील गर्दी कमी व्हावी म्हणून काही बँकांनी एका वेळी एक तर काही बँका एका वेळी पाच खातेदारांना प्रवेश देत आहे. मात्र, याचा परिणाम खातेदारांच्या रांगा लांबपर्यंत जात आहे. बँकामधील गर्दी कमी होण्यासाठी बँकानी ठोस पाउले उचलण्याची गरज आहे. नाहीतर बँकादेखील कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरतील.
ग्राहक काय म्हणतात
मी खात्यातील रक्कम काढण्यासाठी आलो. बँकामधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे एक व्यवहार पूर्ण होण्यास १० ते १५ मिनिटांचा वेळ लागतो. कामात गती आली पाहिजे. शिवाय, ज्येष्ठ नागरिकसाठी स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे.
- बजरंग घाटोळे, पुणे
--
मी कॅश जमा करण्यासाठी आले आहे. मी बँकेच्या सिडीएम सेवेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ठिकाणी ती मशीन तांत्रिक दोषामुळे बंद होती. त्यामुळे मी थेट बँकेत आली. सीडीएम व एटीएम सारख्या सुविधांवर भर दिला पाहिजे.
- पौर्णिमा शहा, पुणे
---
मी मागील अर्धा तासापासून रांगेत उभा आहे. आधार लिंक करण्यासाठी बँकेत आलो आहे. बँकेतील काही कर्मचारी सहकार्य करीत नाही. त्यामुळे मनस्ताप तर होतोच शिवाय वेळ ही खूप वाया जातो. कामे लवकर झाली तर गर्दी होणार नाही.
- संजय निकम, पुणे
काय म्हणतात बँक अधिकारी
आम्ही ऑनलाईन व्यवहारावर जास्त भर दिला आहे. त्यामुळे आमचे ८० टक्के खातेदार बँकेत येतच नाही. बँकेत रोज किमान ५० खातेदार येत आहेत. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे.
- अदिती बालिगा, सारस्वत बँक अधिकारी, कात्रज शाखा
बँकेत गर्दी होऊ नये म्हणून आम्ही रांगेनी प्रवेश देत आहोत. त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी होत नाही. प्रत्येक काउन्टरसमोर एक खातेदार असे आम्ही नियोजन केले आहे. बँकेत फक्त कॅश काढणे, जमा करणे अथवा आरटीजीएस आदी कामे केली जात आहे.
- सोनाली गायकवाड, शाखाधिकारी, एसबीआय, कात्रज शाखा
फोटो - पुण्यातील बहुतांश बँकेसमोर सकाळच्या वेळेत अशी गर्दी होत आहे.
(फोटो -बँक गर्दी नावाने आहे.)