कोरोनाकाळातील सुट्टीत करायचं तरी काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:09 AM2021-04-10T04:09:44+5:302021-04-10T04:09:44+5:30
या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट मात्र विसरायची नाही ते सुट्टी आहे म्हणून नुसता आळसात लोळून दिवस काढायचा असं तर ...
या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट मात्र विसरायची नाही ते सुट्टी आहे म्हणून नुसता आळसात लोळून दिवस काढायचा असं तर होत नाही ना. मग एखादा पिक्चर, एखादी कार्टून सिरीयल आहेत की तोंडी लावायला. पण मोबाईलला हात लावू नका, असं चुकूनही सांगू नका. कारण असं सांगणं म्हणजे मोठ्ठं पाप आहे बरं, मग काय काय करू नको, असं सांगण्यापेक्षा काय करायचं याची यादी तयार करू या की, म्हणजे त्यांच्या 'नसत्या उद्योगांची' यादी, पण हे करताना लक्षात ठेवा बरं, हे सगळे "उद्योग" त्यांचा आनंद आहे आणि ही यादी तयार करताना, त्यांच्याच वयाचे होऊन त्यांना आपल्यात सामील करायला, सॉरी, सॉरी आपण त्यांच्यात सामील व्हायला विसरू नका म्हणजे जून महिना कसा उजाडेल हे समजणारसुद्धा नाही.... मग लागू या कामाला "हॅप्पी सुट्टी"
--
हर्षदा मराठे,
शिक्षिका, सिल्व्हर क्रेस्ट स्कूल, पुणे