काय सांगता? लॉकडाऊनमध्ये पुरुषांचा झाला अधिक छळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 11:49 AM2020-12-10T11:49:37+5:302020-12-10T13:22:05+5:30

पुरुषांकडून आलेल्या तक्रारीत मात्र दीड पट वाढ

What do you say ? Men became more persecuted in lockdown | काय सांगता? लॉकडाऊनमध्ये पुरुषांचा झाला अधिक छळ

काय सांगता? लॉकडाऊनमध्ये पुरुषांचा झाला अधिक छळ

Next

विवेक भुसे- 

पुणे : लॉकडाऊनच्या काळात पतीपत्नी बराच काळ एकत्र राहिल्याने त्यांच्यात छोट्या मोठ्या कारणावरुन वादविवाद होऊ लागले. त्यात दोन्ही कडच्या जवळच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढल्याने ही प्रकरणे अधिकच ताणली जाऊन ती पोलिसांपर्यंत पोहचली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महिलांच्या तक्रारी निम्म्याहून कमी झाल्या असताना पुरुषांकडून आलेल्या तक्रारीत मात्र दीड पट वाढ झाली आहे. पुरुषांचाच अधिक छळ झाल्याचे या तक्रारीवरुन दिसून येत आहे.
भरोसा सेलकडे १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१९ मध्यये ५४४ पुरुषांनी तक्रारी केल्या होत्या. यंदा मात्र त्यात वाढ होऊन तब्बल ७१३ पुरुषांनी आपल्याला पत्नीकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

एरवी बहुतांश पुरुष हे अधिक काळ घराबाहेर रहात असतात. त्यामुळे घरातील बारीक सारीक गोष्टींकडे ते दुर्लक्ष करतात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात दोघेही सर्वाधिक काळ घरात राहिल्याने भरपूर वेळ मिळाल्याने प्रत्येकाच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्येही लक्ष देऊ लागले. त्यामुळे त्यांच्यात खटके उडु लागले. त्यातून वादाचे स्वरुप वाढत गेल्याचे दिसून येत आहे.

एकमेकांविषयी संशय
एकमेकांविषयी संशय हा पुरुषांच्या आणि स्त्रीच्या अनेक तक्रारींचे प्रमुख कारण असल्याचे दिसून येते. एकमेकांच्या नकळत मोबाईल चेक करणे, त्यातून दुसर्याविषय संशय निर्माण होतो. मन चिंती ते वैरी न चिंती या म्हणीप्रमाणे एकमेकांविषयी कळत न कळत संशय निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. त्याचबरोबर पत्नी व तिच्या घरातील लोकांचा संसारामध्ये होणारा हस्तक्षेप हे आणखी एक महत्वाचे कारण पुरुषांच्या तक्रारीत दिसून आले आहे. दोघांच्या भांडणात काहीतरी तोडगा निघावा, हा पुरुषांनी केलेल्या अर्जामध्ये प्रमुख असल्याचे दिसून येते.
भरोसा सेलकडील एकूण अर्ज पुरुष स्त्री
नोव्हेबर २० १७४४ ७१३ १०३९
नोव्हेंबर १९ २८०८ ५४४ २२६४

..............
नोव्हेंबर २० अखेर एकूण ६८२ अर्जांमध्ये समझोता झाला.

नोव्हेंबर १९ अखेर एकूण १२२३ अर्जांमध्ये समझोता झाला.

.....

अल्प काळातील सहवासात दोघांमध्ये वाढते वाद
स्त्रीपुरुषांकडून येणार्या तक्रारींमध्ये सध्या लग्नानंतर अल्प काळातील सहवासात दोघांमध्ये वाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात शुल्कक कारणामध्ये दोघांकडच्या नातेवाईक हस्तक्षेप केला जाऊ लागल्याने ते पुढे वाढत जाते व त्यातून गैरसमज वाढत जाऊन भांडणाचे टोक गाठले जात असल्याचे भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीवरुन दिसून येऊ लागले आहे.

सुजाता शानमे, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल

Web Title: What do you say ? Men became more persecuted in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.