काय सांगता! पुण्यातही घडलं होतं ‘पेगासस’, पत्नीची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी पतीनं केला हा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 01:27 PM2021-09-15T13:27:02+5:302021-09-15T13:27:13+5:30

इस्त्रायली तंत्रज्ञान असलेल्या पेगासस या सॉफ्टवेअरने सध्या जगभर धुराळा उडविला आहे

What do you say! Pegasus had also happened in Pune, the husband did this to get his wife's confidential information | काय सांगता! पुण्यातही घडलं होतं ‘पेगासस’, पत्नीची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी पतीनं केला हा प्रकार

काय सांगता! पुण्यातही घडलं होतं ‘पेगासस’, पत्नीची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी पतीनं केला हा प्रकार

Next
ठळक मुद्देपत्नीला मोबाईल भेट देऊन त्यामध्ये स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर नावाचे अ‍ॅप ठेवले होते

पुणे : आपल्या विरोधकांची माहिती मिळविण्यासाठी इस्त्रायली तंत्रज्ञान असलेल्या पेगासस या सॉफ्टवेअरने सध्या जगभर धुराळा उडविला आहे. भारतातही विरोधकांच्या मोबाईलमध्ये हे सॉफ्टवेअर टाकून राजकीय नेत्यांपासून पत्रकारांपर्यंत अनेक लोकांची माहिती सरकारने गोळा गेल्याचा वाद सध्या गाजत आहे. मात्र, पुण्यातील एका पतीने आपल्या पत्नीची माहिती मिळविण्यासाठी अशाच प्रकारचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला
आहे.

सायबर तज्ञाच्या मदतीने याचा छडा कोथरुड पोलीस लावणार आहेत. याप्रकरणी कोथरुडमधील शिवतीर्थनगरमध्ये राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली बाणेर येथील ३७ वर्षाच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बाणेर आणि कोथरुडमध्ये २३ डिसेंबर २०१३ पासून ५ मे २०१७ दरम्यान  घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी आणि आरोपी हे दोघे पतीपत्नी आहेत. फिर्यादी यांच्याकडे त्यांचे पती वारंवार पैशांची मागणी करीत असत. त्यावरुन त्यांच्या वाद होत होते. पती फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत असत.

त्यावरुन त्यांना शिवीगाळ व मारहाण करीत. फिर्यादी यांना त्यांच्या पतीने २०१३ मध्ये एक मोबाईल भेट
दिला होता. या मोबाईलमध्ये स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर नावाचे अ‍ॅप अगोदर डाऊनलोड करुन ठेवण्यात आले होते. या अ‍ॅपद्वारे त्यांची सर्व गोपनीय माहिती परस्पर आरोपी पतीने त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक लॅपटॉप व मोबाईलमध्ये घेऊन त्याचा गैरवापर केला. पती पत्नी हे दोघेही आता वेगळे राहतात. याबाबत कोथरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडे यांनी सांगितले की, पती पत्नीमधील हा वाद असून मोबाईलमधील सॉफ्टवेअरमार्फत गोपनीय माहिती काढून घेतल्याची पत्नीची फिर्याद आहे. याबाबत सायबर तज्ञांची मदत घेऊन याचा छडा लावण्यात येणार आहे.

पेगासस काय आहे आणि कशाप्रकारे काम करतं?

पेगासस एक सर्व्हेलन्स सॉफ्टवेअर आहे जे इस्रायलची सुरक्षा कंपनी एनएसओ ग्रुपने बनवलं आहे. हे सॉफ्टवेअर वापरून कोणत्याही व्यक्तीचा फोन हॅक केला जाऊ शकतो आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येऊ शकतं. ज्या फोनला लक्ष्य करायचं आहे त्या फोनमध्ये हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जातं. एकदा का ते सॉफ्टवेअर कार्यान्वित झालं की, त्यामुळे फोनचा रिमोट अँक्सेस मिळतो, म्हणजेच फोनच्या जवळ न जाताही त्यातले कॉल लॉग, कॉन्टॅक्ट, मेसेज यांच्यावर लक्ष ठेवता येतं.

Web Title: What do you say! Pegasus had also happened in Pune, the husband did this to get his wife's confidential information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.