राज्य सरकारला लॉकडाऊन करायला काय जातंय? राज ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 01:28 PM2021-07-29T13:28:52+5:302021-07-29T13:28:57+5:30

पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये अनेक विषयांवर भाष्य केलं

What is going on to lockdown the state government? Raj Thackeray's Tola | राज्य सरकारला लॉकडाऊन करायला काय जातंय? राज ठाकरेंचा टोला

राज्य सरकारला लॉकडाऊन करायला काय जातंय? राज ठाकरेंचा टोला

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही

पुणे: लॉकडाउनसंदर्भात आता सरकारने आणखीन थोडी शिथिलता देण्याची गरज आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये सगळं सुरु आहे तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल उपस्थित यांना लॉकडाउन करायला काय जातंय?, असा टोला राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला आहे. एवढचं नाही तर लॉकडाउन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे का असा सवाल उपस्थित करत जर असं असेल तर कोणी प्रश्न विचारायलाच नकोत, असंही ते म्हणालेत. पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये राज ठाकरेंनी लॉकडाउनसंदर्भात बोलत होते. 

यावेळी राज ठाकरे यांनी राज्यामध्ये असणाऱ्या करोनासंदर्भातील नियमांवर आपल्या खास शैलीमध्ये टीका केलीय. 
ते म्हणाले,  आता सरकारने आणखीन थोडी शिथिलता देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. लॉकडाउनमुळे लोकांचे उद्योग बंद झालेत, एवढचं नाही तर लॉकडाउन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे का असा सवाल उपस्थित केला आहे. 

या पत्रकारपरिषदेमध्ये राज यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. खास करुन भाजपासंदर्भात बोलताना राज यांनी आपल्या राजकीय भूमिका फार स्पष्ट असल्याचं सांगितलं. “माझं वैयक्तिक वैर कुणाशीही नाही. मला मोदींच्या, अमित शाहांच्या भूमिका पटत नाहीत. त्या नाही पटल्या तर मी तसं सांगतो. ज्या भूमिका पटल्या त्या पटल्या असंही मी सांगितलंय,” असंही राज म्हणाले.

बस सुरू आणि लोकल बंद यानं नेमकं काय साध्य होणार?

मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालयं सुरू आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्यानं रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद यानं नेमकं काय साध्य होणार?, असा प्रश्न राज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून विचारलेला.

महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही

ही साथ एकाएकी जाणार नाही, असं जगातल्या तज्ञाचं मत आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथीबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहेच, परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतंय असं की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही, असा टोला राज यांनी पत्रातून लगावलेला.

माझा पक्ष मुंबईकरांसोबत उभा राहील

महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत, तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहिलच, परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल, असंही राज म्हणाले होते. मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा सुरु करावी. निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा लोकांना तरी लोकल प्रवासाचा लाभ घेता येईल आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल, असे निर्णय घ्यावेत अशी मागणी राज यांनी केली होती.

Web Title: What is going on to lockdown the state government? Raj Thackeray's Tola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.