जे पेरल तेच उगवलं, विरोधात असलो तरी आम्ही म्हात्रेंच्या पाठीशी; रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 03:10 PM2023-03-12T15:10:24+5:302023-03-12T16:03:57+5:30

भाजप आणि शिंदे गटातील काही जणांनी ही अशा अनेक महिलांचे व्हिडिओ करून टाकले त्यांच्यावर कारवाई न झाल्याने ही हिम्मत वाढली

What is sown grows even if we are against it, we are with the elders Rupali Patil's response | जे पेरल तेच उगवलं, विरोधात असलो तरी आम्ही म्हात्रेंच्या पाठीशी; रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया

जे पेरल तेच उगवलं, विरोधात असलो तरी आम्ही म्हात्रेंच्या पाठीशी; रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया

googlenewsNext

पुणे/किरण शिंदे: शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मार्फ केलेला एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही विरोधात असलो तरी शीतल म्हात्रेंच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

पाटील म्हणाल्या, ज्यांनी कुणी हा व्हिडिओ व्हायरल केला असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. महिला म्हणून आम्ही शीतल म्हात्रे यांच्या पाठीशी आहोत, पणं जे पेरल तेच उगवलं आहे. त्याचा त्रास तुम्हाला होताना दिसत आहे. अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी म्हांत्रेच्या कथित व्हायरल व्हिडिओ वर केलीय. तर आम्ही विरोधात असलो तरी त्यांच्या पाठीशी आहोत. असे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणं निंदनीय आहे असही त्या म्हणाल्या आहेत

सगळ्या विरोधातील महिला शितल म्हात्रे यांच्या सोबत

भाजप आणि शिंदे गटातील काही जणांनी ही अशा अनेक महिलांचे व्हिडिओ करून टाकतात त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे ही हिम्मत वाढली आहे. व्हिडिओ खरा आहे की खोटा हे तपास केल्याशिवाय कळणार नाही. सार्वजनिक ठिकाणी राजकारणी महिला अशी कृत्य करतील असे वाटत नाही. ही खात्री आहे. पण खूप वाईट वाटलं. म्हात्रे आता विरोधकांवर आरोप करत असेल तरी तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलाय. त्या लोकांनी तुमचा व्हिडिओ व्हायरल केलं नाही ना त्याचा तपास झाला पाहिजे. सगळ्या विरोधातील महिला शितल म्हात्रे यांच्या सोबत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

आता तुम्ही यंत्रणा कामाला लावा

आता गृहमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी करुन कारवाई करावी. तसेच सोशल मीडियावर जेजे अंधभक्त व्हिडिओ करून टाकतात त्यांच्यावर ही त्वरित कारवाई करावी ही मागणी आहे. ठाकरे गटातील कोणताही व्यक्ती अस करु शकत नाही. भाजप आणि शिंदे गट सातत्याने बदनामी करत आहे. आमचीही  बदनामी करण्याचं काम भाजप आणि शिंदे गटाच आहे. ठाकरे गटातील कुठलीही व्यक्ती अस करणार नाही, याची चौकशी करा. टीका करायची म्हणून बोलू नका. तुमच्यावर वेळ आली म्हणून तुम्हाला दुःख कळत, पणं अशी वेळ अनेक महिलांवर आली यावर गप्प बसतात, आता तुम्ही यंत्रणा कामाला लावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. 

महिलांवर जो अन्याय होतो त्यांना न्याय मिळाला पाहिजे

हे जर खर असेल तर तश्या प्रकारचा विनय भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. बदनामी केली हा गुन्हा ही दाखल होऊ शकतो. पण यात जर अंध भक्तच निघाले तर सत्ताधारी काय करणार त्याच ही सांगावं. नाहीतर आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही त्यांना फोडून काढतो, परत व्हिडिओ शूटिंग करायला हात पुढे राहणार नाही. पण मी खात्रीशीर सांगते जबाबदारी ने सांगते सोशल मीडियावर हे व्हायरल होणे घातक आहे. गृह खात्याने जाग होऊन यावर त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. फक्त शीतल म्हात्रे नव्हे तर प्रत्येक महिलांवर जो अन्याय होतो त्यांना न्याय मिळाला पाहिजे. 

Web Title: What is sown grows even if we are against it, we are with the elders Rupali Patil's response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.