गणेश प्राणप्रतिष्ठापनेची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या यंदाचे गणेशोत्सवातील महत्वाचे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 12:11 PM2023-09-18T12:11:25+5:302023-09-18T12:16:17+5:30

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते...

What is the right time for Ganesh Prana installation? Know the important days of Ganeshotsav this year | गणेश प्राणप्रतिष्ठापनेची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या यंदाचे गणेशोत्सवातील महत्वाचे दिवस

गणेश प्राणप्रतिष्ठापनेची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या यंदाचे गणेशोत्सवातील महत्वाचे दिवस

googlenewsNext

पुणे : लाडक्या बाप्पाचे आगमन (दि.१९) रोजी होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. म्हणून यावर्षी (दि.१९) सप्टेंबर रोजी भद्रा व वैधृति योग असला तरीही नेहमीप्रमाणे ब्राह्म मुहूर्त म्हणजेच पहाटे ४:५० पासून दुपारी १:५० यावेळेत आपल्या घरात गणेशाची प्राणप्रतिष्ठाना करावी, असे दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले आहे.

यंदाचे गणेशोत्सवातील महत्वाचे दिवस :

मंगळवार, १९ सप्टेंबर : श्रीगणेश चतुर्थी पहाटे ४:५० पासून दुपारी १:५० पर्यंत गणेशाची स्थापना करता येईल.

गुरुवार, २१ सप्टेंबर : गौरी आवाहन सूर्योद्यापासून दुपारी ३:३५ पर्यंत अनुराधा नक्षत्रावर आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.

शुक्रवार, २२ सप्टेंबर : गौरी पूजन

शनिवार, २३ सप्टेंबर : गौरी विसर्जन सूर्योदयापासून दुपारी २.५६ पर्यंत मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करावे.

Web Title: What is the right time for Ganesh Prana installation? Know the important days of Ganeshotsav this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.