दुष्काळी स्थितीवर काय नियोजन केले
By admin | Published: May 13, 2016 01:04 AM2016-05-13T01:04:47+5:302016-05-13T01:04:47+5:30
सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. त्याचा फटका दौंड तालुक्याला बसला आहे. तेव्हा तालुक्यात एकूण किती टँकर सुरू आहेत आणि दुष्काळाचे नियोजन काय करण्यात आले आहे
दौंड : सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. त्याचा फटका दौंड तालुक्याला बसला आहे. तेव्हा तालुक्यात एकूण किती टँकर सुरू आहेत आणि दुष्काळाचे नियोजन काय करण्यात आले आहे, याबाबत ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमात दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे यांनी दुष्काळी परिस्थितीवर झोत टाकला. यावर गटविकास अधिकारी संतोष हराळे म्हणाले, की तालुक्याच्या २२ गावांत २६ टॅँकर सुरू आहेत. परिणामी, तालुक्यातील वाड्यावस्त्यांवर दुष्काळी भाग आहे. पाण्यासाठी १३ विहिरी आणि बोअर अधिग्रहण केलेल्या आहेत. तसेच, माटोबा तलाव येथून टँकर भरले जातात. वरवंडच्या तलावात पाणी लवकर सोडण्यात येणार आहे. या तलावाचादेखील टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी फायदा होणार असून, तसेच दुष्काळी परिस्थितीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, असे संतोष हराळे यांनी स्पष्ट केले.
‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, तसेच शासकीय अधिकारी यांच्यात जनतेच्या प्रश्नांवरून ऊहापोह झाला. अनेक प्रश्नांची उत्तरे ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मिळाल्याची भावना या वेळी नागरिकांनी व्यक्त केली. जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी
आरोग्याचा प्रश्न उपस्थित करून जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजे. कारण दौंड शहर आणि परिसरात गोरगरीब जनता मोठ्या प्रमाणात आहे. याचाही विचार शासनाने करावा, या प्रश्नाबाबत आरोग्य पथकाच्या डॉक्टर मीना भट्टड म्हणाल्या, की शासकीय रुग्णालयात नेहमीच गोरगरीब जनतेला सेवा दिली जाते. मात्र, रुग्णांना सेवा देताना कुठलीही दिरंगाई केली जात नाही.
-बादशहाभाई शेख,
विरोधी पक्षनेते,
दौंड नगर परिषदेचे