नाईट लाईफबद्दल पुण्यातली तरुणाई म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 05:52 PM2020-01-21T17:52:26+5:302020-01-21T17:53:12+5:30
प्रस्ताव आल्यास पुण्यातही नाईट लाईफ सुरु करण्याचा विचार करु असे आदित्य ठाकरे म्हणाले हाेते. याबाबत तरुणाईने मते व्यक्त केली.
पुणे : येत्या 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरु करण्याचा विचार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हंटले हाेते. त्यानंतर पुण्यात एका कार्यक्रमात पुण्यातूनही नाईट लाईफ सुरु करण्याबाबत काही प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करु असेही ते म्हणाले. नाईट लाईफ संकल्पनेला भाजपच्या काही नेत्यांकडून विराेध हाेताना दिसत आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या भूमिकेचे स्वागत केले आहे. नाईट लाईफ हवी की नकाे याबाबत लाेकमतने पुण्यातल्या तरुणाईशी संवाद साधला.
सदाशिव पांढरे म्हणाला, नाईट लाईफ सुरु करु नये असे मला वाटते. नाईट लाईफमुळे जी लाेकं दिवसभर काम करुन घरी दमून येतात त्यांच्यावर याचा परिणाम हाेईल, त्यांना शांतता मिळणार नाही. प्रज्ञा पवार म्हणाली, पुण्यात नाईट लाईफ असायला हवी. दिवसभर अनेकांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही त्यामुळे त्यांना या नाईट लाईफमुळे फायदा हाेईल. परंतु नाईट लाईफ सुरु करताना महिलांच्या सुरक्षिततेचा विचार देखील सरकारने करायला हवा. गाैरांग कुलकर्णी म्हणाला, नाईट लाईफ कायदेशीर सुरु केली तर त्याचे चांगले परिणाम दिसतील. सध्या शहरांमध्ये रात्रीच्या अनेक गाेष्टी सुरु असतात. नाईट लाईफ सुरु झाल्यास रस्त्यावर वर्दळ राहिल्यास रात्री उशीरा घरी जाणाऱ्या महिलांसाठी ते सुरक्षित ठरेल.
यश वैद्य म्हणाला, मला वाटते नाईट लाईफ असावी. माझं हाॅस्टेल रात्री 10 नंतर आत प्रवेश देत नाही. अनेकदा काॅलेजमध्ये विविध प्राॅजेक्टस आणि इव्हेंटसमुळे सात - आठ तेथेच हाेतात. त्यामुळे आम्हाला लगेच हाॅस्टेलला जावे लागते. नाईट लाईफ सुरु झाल्यास रात्रीच्यावेळी मित्रांसाेबत गप्पा मारण्यासाठी वेळ मिळेल. तसेच रात्री उशीरा कुठे खायचे झाल्यास हाॅटेल देखील सुरु राहतील. हिमाली नलावडे म्हणाली, पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. ती आपली ओळख आहे. परंतु तरुणाईला जगात जे सुरु आहे ते स्वतःच्या आयुष्यात देखील हवे असते. नाईट लाईफ जगात सर्वत्र आहे. त्यामुळे पुण्याने सुद्धा हे नवीन कल्चर स्विकारायला हरकत नाही.
भावेश अडवाणी म्हणाला, नाईट लाईफ सुरु करणे याेग्य नाही. पुण्यातही गुन्हेगारी आता माेठ्याप्रमाणावर वाढली आहे. अनेक तरुण हे दारु पिऊन गाडी चालवतात त्यांच्यामुळे इतरांच्या जीवाला धाेका निर्माण हाेताे. या नाईट लाईफमुळे तरुणांचे आयुष्य देखील खराब हाेऊ शकते. त्यामुळे असा निर्णय घेण्यात येऊ नये.