झाडाआड दिसणारी पुण्यातील 'ही' वास्तू कोणती?, मनसे नेत्याचा हटके सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 04:16 PM2021-10-01T16:16:03+5:302021-10-01T16:17:20+5:30

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पुण्यातला एक फोटो शेअर केला आहे.

What is this structure in Pune hidden under a tree, the question of MNS leader anil shidore tweet | झाडाआड दिसणारी पुण्यातील 'ही' वास्तू कोणती?, मनसे नेत्याचा हटके सवाल

झाडाआड दिसणारी पुण्यातील 'ही' वास्तू कोणती?, मनसे नेत्याचा हटके सवाल

Next
ठळक मुद्देअनिल शिदोरे यांनी एकप्रकारे पुणे किती जवळून लोकांना माहितीये, हे पाहण्यासाठीच हा कोडेधारीत प्रश्न केला आहे. त्यावर, अनेकांनी कमेंट करुन उत्तरही दिलंय.

पुणे - राज्याची शैक्षणिक आणि सांस्कतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहराच्या शेकडो खुना आहेत. मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराचं औद्योगिकरण झालंय. आयटी कंपन्यांपासून ते औद्योगिकरणापर्यंत, रस्त्यावरील फेरीवाल्यापासून ते उंचंच उंच टॉवर आणि मॉलपर्यंत पुण्याचा विस्तार झालाय. देशातील नावाजलेल्या महानगरांपैकी पुणे एक आहे. त्यामुळेच, पुणे शहराची ओळख दूरवरुनही सहजच करता येईल. 

पुण्यातील मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पुण्यातला एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, झाडांच्या आड लपलेली पुणे शहरातील एक महत्त्वाची वास्तू दिसते आहे, ही वास्तू कुठली? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 


अनिल शिदोरे यांनी एकप्रकारे पुणे किती जवळून लोकांना माहितीये, हे पाहण्यासाठीच हा कोडेधारीत प्रश्न केला आहे. त्यावर, अनेकांनी कमेंट करुन उत्तरही दिलंय. काहींनी आगा खान पॅलेस असं उत्तर दिलंय. तर, काहींनी ही पुणे विद्यापीठाचाी वास्तू असल्याचं म्हटलंय. झाडांच्या आड लपलेल्या उंचच उंच  दिसणाऱ्या या इमारतीला ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे, हा फोटो पाहून तुम्हाला काय अंदाज येतो. तुम्हाला ओळखता येते का ही वास्तू, हे कमेंट करुन सांगा. 

पुणे विद्यापीठ
पुणे विद्यापीठ हे पुण्यातील आणि महाराष्ट्रातील शिक्षण पंढरी म्हणूनच ओळखलं जातं. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं ते हक्काच आणि अभिमानाचं स्थान आहे. त्यामुळे, पुणे विद्यापीठ छायाचित्रातूनही लक्षात येतं. ऐतिहासिक इमारत आणि नावाजलेलं, चर्चेतलं विद्यापीठ म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ होय. तर, आगा खान पॅलेस हेही पुण्यातील ऐतिहासिक वास्तू आहे. 

आगा खान पॅलेस
सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरा यांनी हा पॅलेस बांधला होता. आगा खान पॅलेस ही एक भव्य इमारत आहे. महात्मा गांधी, त्यांची पत्नी कस्तूरबा गांधी, त्यांची सचिव महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना तुरुंग म्हणून काम केल्यामुळे हा राजवाडा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी जवळचा संबंध आहे. याच ठिकाणी कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचे निधन झाले. 2003 मध्ये, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने ही जागा राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केली.
 

Web Title: What is this structure in Pune hidden under a tree, the question of MNS leader anil shidore tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.