कोरोना नंतरचे आयुष्य कसे असणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:48+5:302021-03-21T04:11:48+5:30

पुणे : कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर ...

What will life be like after Corona? | कोरोना नंतरचे आयुष्य कसे असणार ?

कोरोना नंतरचे आयुष्य कसे असणार ?

Next

पुणे : कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय. पुन्हा कोरोनाचे संकट वाढू लागल्याने सर्वच क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. हे संकट पूर्णपणे कधी जाईल ? यातून बाहेर पडण्यासाठी नेमके काय करावे. हे सगळं कधी संपणार? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार? या व अशा प्रश्नांची उत्तरे मिळणार फक्त लोकमत'' च्या व्यासपीठावर.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे समज गैरसमज पसरले आहेत. कोरोना नंतरचं जग कसे असणार, या माहामारीमुळे आजच्या पिढीचा मानसिक, शाररिक, यावर झालेला परिणाम तसेच पुढील काळात सोसावे लागणारे परिणाम याची चिंता सर्वांनाच लागली आहे. तसेच ऑनलाईन जगतामुळे लहानमुलांचे बालपण हरवले आहे. प्रत्येक्ष जीवनापासून ऑनलाईनच्या आभासी जगात जगावे लागल्यामुळे मुलांवर झालेला परिणाम. या सर्व प्रश्नांची उत्तरे बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिसिएशनचे संस्थापक व पुणे कर्करोग संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे व प्रसिद्ध बाल विशेषज्ञ डॉ. संपदा तांबोळकर सोबत विशेष सत्रातून मिळणार आहेत. तसेच पॉझिटीव्ह रुग्णांना हाताळण्याचे प्रसंग ऐकायला मिळणार आहेत.

कोरोना काळ, अनुभव आणि पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी लाईव्ह मंगळवार दिनांक २३ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता फक्त लोकमत इव्हेंटफुल पेजवर.

Web Title: What will life be like after Corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.