पुणे रेल्वे विभागाचे स्वच्छतेसाठी ‘व्हाट्स अप फोटो ’अभियान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 09:02 PM2018-08-02T21:02:23+5:302018-08-02T21:05:30+5:30

रेल्वे स्थानके तसेच परिसरात अस्वच्छता आढळून आल्यास त्याची छायाचित्र थेट अधिकाऱ्यांना मोबाईलवर पाठविता येणार आहेत.

'What's up photo' campaign for the cleanliness of the Pune railway division | पुणे रेल्वे विभागाचे स्वच्छतेसाठी ‘व्हाट्स अप फोटो ’अभियान 

पुणे रेल्वे विभागाचे स्वच्छतेसाठी ‘व्हाट्स अप फोटो ’अभियान 

Next
ठळक मुद्देछायाचित्र व ठिकाणाचा उल्लेख केल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने त्यावर कार्यवाही

पुणे : रेल्वे स्थानके तसेच परिसरात अस्वच्छता आढळून आल्यास त्याची छायाचित्र थेट अधिकाऱ्यांना मोबाईलवर पाठविता येणार आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एक व्हाट्स अप क्रमांक जाहीर केला आहे. या क्रमांकावर अस्वच्छतेची छायाचित्रे टाकण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून रेल्वे स्थानक व परिसरामध्ये स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने थेट प्रवाशांना या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. त्यासाठी ९७६६३५३७७२ हा मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे. या क्रमांकावर प्रवाशांना रेल्वे स्थानक तसेच परिसरातील अस्वच्छतेची छायाचित्रे  अपवर पाठविता येणार आहेत. हे छायाचित्र व ठिकाणाचा उल्लेख केल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने त्यावर कार्यवाही केली जाईल. हा क्रमांक पुणे विभागातील सर्व स्थानकांवर लावले जाणार आहेत. प्रवाशांनी रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: 'What's up photo' campaign for the cleanliness of the Pune railway division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.