वॉट्सअ‍ॅपवर जमतोय कौटुंबिक गोतावळा...!

By Admin | Published: May 15, 2016 12:50 AM2016-05-15T00:50:56+5:302016-05-15T00:50:56+5:30

घरात सर्वजण एकत्र बसून जेवणाचे दिवस आता मागे पडले आहेत... नोकरी-व्यवसायामुळे क्वचितच एकमेकांशी संवाद होतो... जवळच्या नातेवाईकांतील संबंध उपचारापुरतेच ठरत आहेत.

Whatsappapproved Family Got ...! | वॉट्सअ‍ॅपवर जमतोय कौटुंबिक गोतावळा...!

वॉट्सअ‍ॅपवर जमतोय कौटुंबिक गोतावळा...!

googlenewsNext

पुणे : घरात सर्वजण एकत्र बसून जेवणाचे दिवस आता मागे पडले आहेत... नोकरी-व्यवसायामुळे क्वचितच एकमेकांशी संवाद होतो... जवळच्या नातेवाईकांतील संबंध उपचारापुरतेच ठरत आहेत. पण तंत्रज्ञानामुळे आता या नात्यांमध्ये पुन्हा संवाद होवून ख्याली-खुशाली समजू लागली आहेच शिवाय जगभरातील नातेवाईक देखील पुन्हा जवळ आले आहेत. ‘वॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून हा कौटुंबिक गोतावळा जमू लागला आहे.
पुर्वी कौटुंबिक संवाद समोरा-समोर होत होता. परगावातील नातेवाईकांना भेटण्यासाठी खास वेळ काढला जायचा. कामाच्या धबडग्यात आवर्जुन एखाद्याला फोन करायचे दिवस आता राहिले नाहीत. नोकरी-व्यवसायामुळे कुटूंबातील वातावरण विसंवादी बनू लागले आहे. मात्र जगातील कानाकोपऱ्यात असलेल्या कुटूंबातील सदस्यांना गप्पा-टप्पा मारण्यासाठी हा ई-कट्टा मिळाला आहे. ग्रुपमध्ये २०० हून अधिक सदस्य सामावून घेण्याची क्षमता असल्याने मोठा ई-गोतावळा तयार झाला आहे.
या ग्रुपलाही मजेशीर नावे दिली जातात. अनेक ग्रुपची नावे आडनावाने सुरू होतात. स्वीट फॅमिली, ग्रेट फॅमिली, फॅमिली रॉक्स् अशी आगळीवेगळी नावेही दिली जातात.
वाढदिवस, लग्न किंवा कोणत्याही कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ ग्रुपवर अपलोड केले जातात. प्रत्यक्ष सहभागी न झालेल्यांनाही त्याचा आनंद घेता
येत आहे. संगणक अभियंता असलेल्या निलम मिरजकर पाठक या मागील आठ-दहा वर्षांपासून अमेरिकेत राहतात. पण त्यांच्या कुटूंबातील बारा सदस्यांच्या ‘स्वीट फॅमिली’ या वॉट्स अ‍ॅप ग्रुपमुळे त्यांना कुटूंबातील प्रत्येक बाबीचा आनंद घेता येतो. कुटूंबातील चर्चांमध्ये थेट सहभागी होता येते. ‘अमेरिकेतून दोन-तीन वर्षातून पुण्यातील घरी येते. त्यामुळे आई, बहीण-भावासह इतर नातेवाईकांची सतत आठवण येते. मी आईशी दररोज फोनवरून बोलत असते. पण कुटूंबाच्या वॉट्स ग्रुपमुळे एकाचवेळी सर्वांशी थेट संवाद साधता येतो. त्यामुळे प्रत्येकाशी प्रत्यक्ष बोलल्याचा आनंद मिळतो. घरात कोणताही कार्यक्रम झाल्यानंतर त्याचे फोटो, व्हिडिओ अपलोड केले जातात. ते पाहून या कार्यक्रमात आपण प्रत्यक्ष हजर असल्याचा फील येतो.’अनेक नाती गवसली
मार्केटयार्ड येथे राहणाऱ्या रसिका चव्हाण यांचा ‘कामतेकर फॅमिली’ नावाचा वॉट्स अप गु्रप आहे. या ग्रु्रपमुळे त्यांना अनेक दुर गेलेली नाती गवसली. त्या म्हणाला, वॉट्सअपमुळे दुर गेलेली नाती जवळ आली आहेत. कुटूंबातील काही नातेवाईकांना मी कधीही पाहिले नव्हते. कधीही बोलणे झाले नव्हते. पण या ग्रुपमध्ये सहभागी झाले आणि एक-एक नातेवाईकांची ओळख होवू लागली. कामातील व्यग्रतेमुळे प्रत्यक्ष भेटणे होत नाही. पण या ग्रुपवर कुटूंबातील विविध प्रकारच्या चर्चा होतात. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होता येते.

Web Title: Whatsappapproved Family Got ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.