थंडीमुळे गव्हाचे पिक जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:15 AM2020-12-30T04:15:05+5:302020-12-30T04:15:05+5:30
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील कुरवली,चिखली,जांब ,उद्घट ,तावशी या गावातील नीरा नदीलगत च्या शेतकऱ्यांनी गहू पेरणी केली आहे.सध्या थंडीचा कडका ...
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील
कुरवली,चिखली,जांब ,उद्घट ,तावशी या गावातील नीरा नदीलगत च्या शेतकऱ्यांनी गहू पेरणी केली आहे.सध्या थंडीचा कडका वाढला असल्याने ही थंडी गव्हासाठी पोषक ठरत आहे.
गेल्या महिन्यात बदलत्या हवामानामुळे गहू पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी चिंता केली होती अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे गव्हाच्या पिकांची नासाडी होईल या काळजीने शेतकरी धास्तावले होते.परंतु सध्या परिसरात निरा नदीत मुबलक पाणी असल्यामुळे शेतकरीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.या आठवड्यात थंडीचे प्रमाण वाढले असल्याने ही थंडी गव्हासाठी पोषक ठरत आहे. या भागातील बहुतांश शेतकरी ऊस उत्पादक असून उस हंगाम सुरु असल्याने ज्या शेतकऱ्यांचे ऊस तोडणी झाली आहे अशा शेतकऱ्यांनी गहू पेरणी केली. सध्याचे पोषक हवामान गव्हासाठी अनुकूल ठरत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी गहू,हरभरा,मका,ज्वारी इ पिके घेतली असल्यामुळे थंडीमुळे पिके जोमदार येणार आहेत.
फोटो ओळ - तावशी ता.इंदापूर येथे जोमदार आलेले गहु पिक