बारामती तालुक्यात गव्हाचे उत्पादन वाढणार
By admin | Published: January 8, 2017 03:18 AM2017-01-08T03:18:42+5:302017-01-08T03:18:42+5:30
तालुक्यात रब्बी हंगामात सरासरीच्या ८२.४२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये चारापिके आणि रब्बी ज्वारीखालील क्षेत्राचा अधिक समावेश आहे. तर तालुक्यामध्ये
बारामती : तालुक्यात रब्बी हंगामात सरासरीच्या ८२.४२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये चारापिके आणि रब्बी ज्वारीखालील क्षेत्राचा अधिक समावेश आहे. तर तालुक्यामध्ये ५ हजार २२५ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे, अशी माहिती तालुका कृषी विभागाने दिली.
बारामती तालुका रब्बी तालुका म्हणून ओळखला जातो. रब्बीमध्ये प्रामुख्याने ज्वारी पीक घेतले जाते. त्या खालोखाल मका, गहू, हरभरा व चारापिकांच्या लागवडी शेतकरी करीतो. बारामती तालुक्याचा भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता, नीरा डावा कालव्यामुळे परिसरात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. तालुक्याच्या जिरायती पट्ट्यांमध्ये तृणधान्य, कडधान्यांचे पीक घेतले जाते. जिरायती पट्ट्यामध्ये ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. सध्या येथील ज्वारी हुरड्यामध्ये आली आहे. यंदा ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र पेरणी क्षेत्र सरासरीपर्यंत पोहोचले नाही. तालुक्यात ४२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. जिरायती पट्ट्यात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, चाराटंचाईमुळे दुग्धव्यावसायदेखील आर्थिक संकटात सापडला होता. सध्या तालुक्यात ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर चारापिकाची लागवड झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या ९६.४४ टक्के क्षेत्रावर चारापिकाची लागवड झाली आहे. दुग्धव्यवसायामुळे येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात तृणधान्य, कडधान्यांचे पीक घेतात. या पिकांच्या उत्पादनानंतर त्याचा जनावरांना चारा म्हणून देखील वापर करता येतो. तृणधान्याची ४९ हजार ७३७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. तर कडधान्याची ३ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मक्याची १ हजार ७१२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका पिकाने सरासरी ओलांडली आहे. चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड होत असल्याने पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. त्याबरोबरच हरभरा ३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिरायती भागातील नगदी पीक म्हणून कांद्याची ओळख आहे. यंदाच्या वर्षी ३ हजार ९७४ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. तर एकूण भाजीपाला लागवड ५ हजार २३८ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.तालुका कृषी विभागाच्या पेरणी अहवालानुसार तालुक्यात अडसाली उसाची १२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्याचबरोबर पूर्वहंगामी २ हजार २४१, खोडवा ८ हजार ४९५ तर सुरू लागणीमध्ये ६३८ हेक्टर क्षेत्र आहे. तालुक्यात एकूण २३ हजार ३७४ हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक उभे आहे.
पीक व पेरणी झालेले क्षेत्र
(हेक्टरमध्ये)
पिकेपेरणी
ज्वारी४२,८००
मका१,७१२
गहू५,२२५
सूर्यफुल१५
करडई१५
चारापिके४,२०० तरकारी पिकाखालील क्षेत्र
(हेक्टरमध्ये)
भाजीपालापेरणी क्षेत्र
कांदा३,९७४
टोमॅटो१९३
वांगी१८३
भेंडी१०४
घेवडा१४७
मेथी९१
मिरची६८
कोथिंबीर५४
गवार ९६
पालेभाज्या३२८
एकूण क्षेत्र ५,२३८