एसटीने पुण्यात येताहेत गहू, ज्वारी, चिंचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:00+5:302021-05-29T04:10:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) मालवाहतुकीस राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या विविध भागातून मोठ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) मालवाहतुकीस राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य पुण्यात येत आहे. यात गहू, ज्वारी, चिंच तसेच अन्य शेतमालाचा समावेश आहे. अलीकडच्या काही दिवसातच सुमारे तीनशे टनांपेक्षा जास्त शेतमाल एसटीने पुण्यात वाहून आणला आहे.
गेल्या वर्षीपासून एसटीने माल वाहतूक सुरु केली. यातून सुमारे ५६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. सध्या पुण्यात आलेली ज्वारी, गहू सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर येथून आली आहे. मोठ्या प्रमाणात चिंचाही पुण्यात आल्या आहेत. गेल्याच आठवड्यात रत्नागिरीतून एसटीने आंबे वाहतूक पुण्यात केली.
चौकट
“सोलापूर विभागातील वेगवेगळ्या आगारातून विविध प्रकारचा शेतमाल पुण्याला पाठविला जात आहे. यात प्रामुख्याने गहू, ज्वारी, चिंचा यांचा समावेश आहे.”
-विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर विभाग