जेव्हा चाचा चौधरी मोदी सरकारच्या योजनांची माहिती देतात... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 06:23 PM2018-05-28T18:23:22+5:302018-05-28T18:23:22+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडलेल्या योजनांचा प्रचार 'चाचा चौधरी आणि मोदी' या पुस्तकाच्या मार्फत केला जात असल्याचा आक्षेप खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंदवला. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

When Chacha Chaudhary approves the plans of Modi government ... | जेव्हा चाचा चौधरी मोदी सरकारच्या योजनांची माहिती देतात... 

जेव्हा चाचा चौधरी मोदी सरकारच्या योजनांची माहिती देतात... 

Next

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडलेल्या योजनांचा प्रचार 'चाचा चौधरी आणि मोदी' या पुस्तकाच्या मार्फत केला जात असल्याचा आक्षेप खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंदवला. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 
सर्वशिक्षा अभियानाच्या अंतर्गत अवांतर वाचनासाठी देशभरातील जिल्हा परिषदांना पुस्तके देण्यात येतात. त्यात 2017-18 साली चाचा चौधरी आणि मोदी असे चित्ररूपी पुस्तकही देण्यात आले होते. त्यात चाचा चौधरी ही व्यक्तिरेखा मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती देण्यात आली आहे.या पुस्तकाची किंमत 35 रुपये आहे. हे पुस्तक प्रत्येक जिल्हा परिषदेतून शाळांमध्ये देण्यात आले.
आम्ही शिक्षणामध्ये कोठेही राजकारण करत नाही. मात्र, जिल्ह्या परिषदेच्या शाळांमध्ये 'चाचा चौधरी आणि मोदी' यासारखी पुस्तके आणून सरकारच राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी सुळे यांनी केला आहे. तसेच शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडल्याची खरमरीत टीकाही त्यांनी केली.

शिक्षणमंत्री तावडेंनाही हवी ट्युशन - सुप्रिया सुळे
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बॉसलाच ट्युशन लावण्याची गरज आहे. त्यामुळे तावडे यांनादेखील शाळा बंद धोरणावर माजी शिक्षणसंचालक वसंत काळपांडे यांच्याकडे ट्युशन लावायला हवी असे मत खासदार  सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
 

Web Title: When Chacha Chaudhary approves the plans of Modi government ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.