उपजिल्हा रुग्णालयाला मुहूर्त कधी?
By admin | Published: March 4, 2016 12:31 AM2016-03-04T00:31:44+5:302016-03-04T00:31:44+5:30
येथील अद्ययावत असे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, हे काम रखडलेलेच असल्याने या रुग्णालयाचा मुहूर्त कधी लाभणार, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
जेजुरी : येथील अद्ययावत असे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, हे काम रखडलेलेच असल्याने या रुग्णालयाचा मुहूर्त कधी लाभणार, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
सन २०१३ मध्ये शासनाच्या आरोग्य विभागाने तीर्थक्षेत्र जेजुरी येथे अद्ययावत असे ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीस सुरुवात केली आहे. तीस खाटांचे हे रुग्णालय वर्षभरात उभे करण्याचा मनोदय तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी भूमिपूजनप्रसंगी आश्वासन दिले होते. आज तीन वर्षे होऊन गेली. मात्र, रुग्णालयाचे काम अपूर्णच आहे. तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने राज्यभरातून येथे दररोज हजारो भाविक येत असतात, त्याचबरोबर जेजुरीनजीकच औद्योगिक वसाहत उभी राहिलेली असल्याने येथील लोकसंख्याही झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत ग्रामीण रुग्णालयाची गरज भासल्याने आरोग्य विभागाने जेजुरी नगर पालिकेकडून जागा उपलब्ध करून घेऊन या रुग्णालयाचे काम हाती घेतलेले आहे. मात्र, काम अपूर्णच राहिल्याने नागरिकांत चर्चा आहे.