माळशेज घाट रेल्वेमार्गाला मुहूर्त कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 02:16 PM2019-12-11T14:16:01+5:302019-12-11T14:23:31+5:30

मार्गावर २६ रेल्वे स्थानक प्रस्तावित

When is the Malshez Ghat Railway route start ? | माळशेज घाट रेल्वेमार्गाला मुहूर्त कधी?

माळशेज घाट रेल्वेमार्गाला मुहूर्त कधी?

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वेक्षणाचे काम झाले पूर्ण; कामे मात्र रखडलेलीमार्गाचे तांत्रिक सर्वेक्षणाचे काम सुरू हा मार्ग कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, माळशेज घाट,  ओतूर ते नगर असा जाणार

राजुरी : नगर, ठाणे, पुण्याच्या ग्रामीण भागासाठी वरदान ठरणाऱ्या आणि तब्बल २२ वर्षांपेक्षाही अधिक काळ रखडलेल्या माळशेज रेल्वे मार्गाचे प्राथमिक आणि तांत्रिक सर्वेक्षणाचे काम कल्याण ते नगरपर्यंत पूर्ण झाले आहे. या मार्गावर २६ रेल्वे स्थानके  प्रस्तावित असून या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला कधी महूर्त मिळणार, या प्रतीक्षेत तिन्ही जिल्ह्यांतील नागरिक आहेत. 
 घाटाचा विकास व्हावा तसेच जलद वाहतूकीसाठी हा रेल्वे मार्ग प्रस्तावित होता. या मार्गाचे तांत्रिक सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. कल्याण ते नगर पर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्णही झाले. ठाणे जिल्हा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात ही माहिती  वर्षांपूर्वी उघडकीस आणली होती. या मार्गाचे तांत्रिक सर्वेक्षण एक वर्षाआधीच पूर्ण करण्यात आले आहे. हा मार्ग कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, माळशेज घाट,  ओतूर ते नगर असा जाणार आहे. या मार्गावर कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ कांभा रोड, आपटी, पाटगाव, मुरबाड, राव, डाहेरी मिल्हे, नागतार केबिन, वारीवघर केबिन, देवरूखवाडी, केबिन, मढ, जुन्नर रोड, ओतूर, पदरवाडी, मालवाडी, कोटडावाडी, शिंदेवाडी, वासुंदे, धोत्रे, भाळवणी, हमीदपूर आणि अहमदनगर अशी रेल्वे स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहे. 
   हा रेल्वे मार्ग पूर्णत: फायद्यात असल्याचे सांगण्यात येत असून या तांत्रिक सर्वेक्षणाचाचा प्राथमिक अहवाल आला असला तरी अंतिम अहवाल तयार करण्यात आल्यानंतरच तो रेल्वे बोर्डापुढे  मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. त्याला मान्यता मिळण्याची आता फक्त औपचारिकता बाकी असल्यामुळे हा मार्ग मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे माळशेज पट्टा व ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार हे नक्की.
......
मार्ग विशाखापट्टणमपर्यंत जोडता येणार
नगर -औरंगाबादमार्गे पुढे विशाखापट्टणम हा मार्गदेखील जवळ होऊन जोडला जाऊ शकतो. त्यामुळे हा नवा माळशेज रेल्वे मार्ग ठाणे, पुणे व नगर या तिन्ही जिल्ह्यांतील शेतकºयांच्या विकासाचे नवीन पर्व घेऊन येणार असे वाटते आहे. तसेच हा मार्ग होण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील तसेच जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांनी पुढाकार घेऊन  हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मागणी होत आहे.
.........

तब्बल २२ वर्षांपासून काम रखडले 
सर्वेक्षणाचे कल्याण ते नगर काम पूर्ण 
पूर्णत: फायद्याचा मार्ग असल्याचा दावा 
माळशेज पट्ट्याच्या विकासाला तारक 
जुन्नरच्या पर्यटन विकासाला फायदा 
ठाणे, नगर, पुणे या तीन जिल्ह्यांना उपयुक्त  
.......
माळशेज रेल्वे धावू लागल्यास ठाणे, पुणे व नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांना दूरची बाजारपेठ नजीक उपलब्ध होणार आहे. 
2यामुळे त्यांना उत्पन्नाचा नवीन पर्याय मिळणार आहे. शिवाय पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळणार असून पर्यटन क्षेत्रात जुन्नर तालुक्यात माळशेज रेल्वे क्रांती निर्माण करेल असा तज्ज्ञांकडून अंदाज वर्तविला जात आहे. 

Web Title: When is the Malshez Ghat Railway route start ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.