डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी कधी पकडणार ; हमीद दाभोलकर यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 02:49 PM2019-08-16T14:49:34+5:302019-08-16T14:52:11+5:30

डॉ. नरेंद्र  दाभोलकरांच्या मारेक-यांचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते. केवळ त्यांच्या विचारांना विरोध करण्यासाठी भडकावले गेल्याने हा खून करण्यात आला.

When Narendra Dabholkar's murder will find ; The question by Hamid Dabholkar | डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी कधी पकडणार ; हमीद दाभोलकर यांचा सवाल 

डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी कधी पकडणार ; हमीद दाभोलकर यांचा सवाल 

Next

पुणे: डॉ. नरेंद्र  दाभोलकरांच्या मारेक-यांचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते. केवळ त्यांच्या विचारांना विरोध करण्यासाठी भडकावले गेल्याने हा खून करण्यात आला. अशा पार्श्वभूमीवर मारेक-यांच्या इतकेच त्यांची डोकी नियोजनबद्ध पद्धतीने भडकवणारे सूत्रधार देखील जबाबदार आहेत .जोपर्यंत हे सूत्रधार मोकाट आहेत तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम आहे. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी पकडले, सूत्रधार कधी पकडणार? असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शासनाला विचारला आहे.
          डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला येत्या २० ऑगस्टला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला येत्या २० आॅगस्टला सहा वर्षे पूर्ण होत आहेत .उच्च न्यायालयाने अनेक वेळा फटकारल्या नंतर गेल्या वर्षी सीबीआय ने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांना अटक केली होती. त्यानंतर अनेक वर्षे लांबलेल्या या प्रकरणातील तपास जलदगतीने पूर्णत्वाला जाईल आणि या खुनाच्या मागील सूत्रधारांना अटक केली जाईल अशी अपेक्षा होती.पण तपास हा अतिशय संथ गतीने सुरु असल्याचे दिसून येत असल्याकडेही महाराष्ट्र अंनिसने लक्ष वेधले . या वेळी महाराष्ट्र अंनिस चे प्रधान सचिव मिलिंद देशमुख ,पुणे जिल्हा कार्यध्यक्ष नंदिनी जाधव ,पुणे शहर अध्यक्ष श्रीपाल ललवाणी, दीपक गिरमे आणि  हमीद दाभोलकर उपस्थित होते. 
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, डॉ नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासातून आणि आजपर्यंत दाखल झालेल्या आरोपपत्रांमध्ये हे चारही खून एका सामाईक उद्दिष्टाने आणि एकाच विशिष्ट कट्टरपंथीय संघटनेच्या लोकांकडून झाल्याचे पुढे आले आहे. तरी देखील  शासन या संघटनेविषयी ठोस कारवाई करताना दिसत नाही हे निषेधार्ह आहे. त्यामुळे आणखी वेळ न दवडता या सूत्रधारांवरती कारवाई करण्यात यावी.
डॉ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाच्या मध्ये अटक झालेल्या  अमोल काळे , अमित दिग्वेकर ,राजेश बंगेरा या तिघांवर सीबीआयने वेळेत आरोपपत्र दाखल केले नसल्याने त्यांना जमीन मंजूर झालेला आहे. इतर गुन्ह्यात अटक असल्याने जरी अजून त्यांची सुटका झाली नसली तरी चारही विवेकवाद्यांच्या खुनामध्ये सहभागी असलेल्या लोकांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात सीबीआय अक्षम्य दिरंगाई करीत असल्याची खंत देखील त्यांनी या वेळी व्यक्त केली. 
दाभोलकर यांच्या खुनाच्यासाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलांचे भाग मुंबई जवळच्या खाडीतून शोधून काढण्यासाठीच्या परवानग्या मिळण्यासाठी उच्च न्यायालयाने वेळोवेळी नाराजी दाखवून देखील जवळजवळ सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ परवानगी मिळू शकत नाही याकडे देखील त्यांनी या वेळी लक्ष वेधले. 

Web Title: When Narendra Dabholkar's murder will find ; The question by Hamid Dabholkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.