जेव्हा साबरमती अाश्रम लाॅ काॅलेज रस्त्यावर साकारते तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 06:09 PM2018-08-16T18:09:19+5:302018-08-16T22:21:58+5:30
पुण्यातील एफटीअायअायच्या प्रवेशद्वाराजवळ साबरमती अाश्रमाची प्रतिकृती साकारण्यात अाली असून. सध्या येथून जाणाऱ्या नागरिकांचे ती लक्ष वेधून घेत अाहे.
पुणे : गांधीजींच्या अायुष्यात साबरमती अाश्रमला माेठे महत्त्व अाहे. अनेक अांदाेलनांची रणनिती या ठिकाणावरुन ठरविण्यात अाली हाेती. याच अाश्रमाती प्रतिकृती पुण्यातील लाॅ काॅलेज रस्त्यावर असणाऱ्या फिल्म अॅण्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट अाॅफ इंडियाच्या( एफटीअायअाय) प्रवेशद्वारावर साकारण्यात अाली अाहे.
फिल्म अॅण्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट अाॅफ इंडिया (एफटीअायअाय) च्या अार्ट डिमार्टमेंटच्या माध्यमातून गेल्या दाेन वर्षांपासून 15 अाॅगस्ट अाणि 26 जानेवारी राेजी स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित कलाकृती साकारण्यात येते. एफटीअायअायच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेर ही कलाकृती उभारण्यात येते. अात्तापर्यंत जालियनवाला बाग, इंडिया गेट ची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी साकारली अाहे. यंदाच्या कलाकृतीचा विचार करत असताना महात्मा गांधीजींचे 150 वे जयंती वर्ष असल्याने त्यांच्या संबंधित एखादी वास्तू उभारावी असा विचार करण्यात अाला. त्यातही साबरमती अाश्रमाचे गांधीजींच्या अायुष्यात माेठे महत्त्व असल्याने तसेच त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील याेगदान खूप माेठे असल्याने साबरमती अाश्रमाची प्रतिकृती साकारण्याचे ठरविण्यात अाले. यासाठी साबरमती अाश्रमाचा अभ्यास करण्यात. महिनाभर अभ्यास केल्यानंतर ही वास्तू तयार करण्यात अाली. प्रत्यक्ष प्रतिकृती तयार करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागला.
याविषयी बाेलताना इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक अाशिताेष कविश्वर म्हणाले, गेल्या दाेन वर्षांपासून एफटीअायअाय स्वातंत्र्यदिन अाणि प्रजासत्ताकदिनी वेगवेगळ्या थिम घेऊन कलाकृती तयार करत असते. यंदा गांधीजींचे 150 वं जयंती वर्ष अाणि त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील याेगदान लक्षात घेता त्यांच्या संदर्भातील एखादी वास्तू उभारण्याचे ठरविण्यात अाले. त्यात साबरमती अाश्रमाचे गांधीजींच्या अायुष्यात माेठे स्थान अाहे. साबरमती अाश्रमात गांधीजींचे 10 ते 12 वर्ष वास्तव्य हाेतं. दांडी यात्रेचा लढा हा याच ठिकाणावरुन सुरु करण्यात अाला हाेता. गांधीजींच्या अनेक अाठवणी या जागेशी जाेडल्या गेल्या अाहेत. या सर्व दृष्टीकाेनातून साबरमती अाश्रम साकारणे अाम्हाला याेग्य वाटले. 30 अाॅगस्टपर्यंत ही प्रतिकृती सर्वांना पाहण्यास खुली असणार अाहे.