सरसंघचालक वारजेत येतात तेव्हा...

By admin | Published: January 5, 2016 02:25 AM2016-01-05T02:25:28+5:302016-01-05T02:25:28+5:30

सरसंघचालक मोहन भागवत यांचे बंधू चित्तरंजन भागवत वारज्यातील तेजोवलय सोसायटीत राहतात. दुपारी साधारण दीड वाजता भागवत हे वारज्यात आले;

When Sarsanghchalak arrives in Waraj ... | सरसंघचालक वारजेत येतात तेव्हा...

सरसंघचालक वारजेत येतात तेव्हा...

Next

वारजे : सरसंघचालक मोहन भागवत यांचे बंधू चित्तरंजन भागवत वारज्यातील तेजोवलय सोसायटीत राहतात. दुपारी साधारण दीड वाजता भागवत हे वारज्यात आले; परंतु ते भावाच्या घरी न जाता याच सोसायटीत राहणाऱ्या सार्थक शिंदे यांच्या घरी थांबले.
दुपारी त्यांना भेटायला गेलेल्या नीलकंठ मराठे यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली.
तेव्हा पदस्पर्श, छायाचित्र व स्वहस्ताक्षर देणे हे माझ्या तत्वात
बसत नाही, ही सर्व राजनेत्यांची कामे आहेत व मी काही राजनेता नाही, असे त्यांनी सुनावले. संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांनी चांदणी चौकाजवळ एका लग्न समारंभात भाग घेतला. त्यांनतर परत येऊन त्यांनी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रात्रीचे जेवण घेतले. जेवणानंतर त्यांनी शिंदे यांचे घर सोडले. त्या वेळी त्यांना भेटायला इमारतीच्या खाली थांबलेल्या इतर नागरिकांशी संवाद साधत पाटणा एक्स्प्रेस पकडण्यासाठी ते रेल्वे स्टेशनकडे मार्गस्थ झाले.(प्रतिनिधी)
पोलिसांचा ताफा व नागरिकांची भंबेरी
यापूर्वी भागवत या सोसायटीत आले आहेत, पण तेव्हा त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था नव्हती. आजच्या त्यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. तेजोवलय सोसायटीत दुपारी अचानक पोलीस वाहनांचा ताफा आल्याने नागरिक गडबडले.

Web Title: When Sarsanghchalak arrives in Waraj ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.