"केंद्र सरकार किंवा भाजपच्या विरोधात बोलले की ते कटकारस्थान करतात"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 03:46 PM2023-09-25T15:46:58+5:302023-09-25T15:47:29+5:30

सत्तेचा गैरवापर कसा करायचा असतो आणि दडपशाही कशी वाढवायची याचे आणखी एक जिवंत उदाहरण म्हणजे एका चॅनेलवर बंदी आणणे हे आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली....

When they speak against the central government or the BJP, they conspire Supriya Sule | "केंद्र सरकार किंवा भाजपच्या विरोधात बोलले की ते कटकारस्थान करतात"

"केंद्र सरकार किंवा भाजपच्या विरोधात बोलले की ते कटकारस्थान करतात"

googlenewsNext

बारामती (पुणे) : केंद्र सरकार किंवा भाजपच्या विरोधात काही बोलले तर काही तरी कटकारस्थान ते करतात. पक्ष फोडणे, सीबीआय, ईडीमध्ये ते मग्न आहेत. त्यांना विकास करायला वेळ नसतो. सत्तेचा गैरवापर कसा करायचा असतो आणि दडपशाही कशी वाढवायची याचे आणखी एक जिवंत उदाहरण म्हणजे एका चॅनेलवर बंदी आणणे हे आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

बारामतीत एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला. सुळे म्हणाल्या, पक्ष फोडण्याऐवजी त्यांनी विकासाकडे लक्ष द्यावे. देशात आणि राज्यात अनेक विषय आहेत. मणिपूर, कॅनडा, महागाई, बेरोजगारी असे प्रश्न असताना भाजपचे कटकारस्थान सुरू असते.

बारामतीत सुनेत्रा पवार तुमच्या विरोधात खासदारकीची निवडणूक लढविण्याची चर्चा असल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, आमच्याकडून तरी लोकशाही आहे, आता दिल्लीत काय दडपशाही चालते हे संपूर्ण देश पाहतो, पण आमच्याकडून लोकशाहीच आहे, मला असे वाटते की कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच आहे, आपण सर्वांनीच या गोष्टीचा मानसन्मान करायला हवा, तीन वेळा भाजप माझ्याविरोधात लढला आहे, याही वेळेस कोणीतरी लढणारच, लोकशाहीचे मी मनापासून स्वागत करते, ही लोकशाही जगली, टिकली पाहिजे, त्यामुळे सर्वांनीच अशा निर्णयाचे पूर्ण ताकदीने स्वागत करायला हवे.

मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाच्या अनेक वर्षांच्या मागण्या आहेत, पाच दिवसांच्या संसदेच्या अधिवेशनात एक दिवस किमान या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा ठेवायला हवी होती, महागाई बेरोजगारी यावर चर्चा झाली नाही, पाच दिवसांचे अधिवेशन चारच दिवसांत गुंडाळले, ही बाब दुर्दैवी आहे. महिला विधेयक आणले, पण नंतर कळले हा जुमला आहे. लोकांच्या पदरात या अधिवेशनातून काहीही पडलेले नाही.

दुष्काळ, बेरोजगारी, महागाई यात बारामती लोकसभा मतदारसंघासह राज्यासमोर विविध आव्हाने आहेत, काश्मीर, मणिपूरच्या प्रश्नाबाबत गंभीर स्थिती आहे, मोठी आव्हाने असताना भाजप जी कटकारस्थान करतो त्याचे मला काहीही आश्चर्य वाटत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडवून मतदार जे बोलले त्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, आता सर्वांनीच नागपूरकरांच्या मदतीला धावून जायला हवे, एक मात्र नक्की भाजपचे नेतृत्व पक्ष फोडणे, घर फोडणे, एजन्सीचा वापर यात इतके मग्न असतात, की त्यांना विकासासाठी वेळच नसल्याचे सुळे म्हणाल्या.

Web Title: When they speak against the central government or the BJP, they conspire Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.