धावत्या बसचे चाक रात्री निखळते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 10:00 PM2019-08-01T22:00:56+5:302019-08-01T22:05:02+5:30

बसचे चाक निखळून काही फुट अंतरावर पडलेले दिसते अन् सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो...

When the wheel of a running bus breaks down ... | धावत्या बसचे चाक रात्री निखळते तेव्हा...

धावत्या बसचे चाक रात्री निखळते तेव्हा...

googlenewsNext

पुणे : रात्री दहाची वेळ.. पावसाची रिमझिम सुरू असते...पीएमपी ची एक बस नेहरू रस्त्याने जात असताना अचानक मोठा आवाज होतो. बसमधील प्रवाशांना काही कळण्याच्या आतच बस डाव्या बाजुला झुकते अन् थांबते... प्रवाशांसह चालक-वाहक जीव मुठीत धरून लगबगीने खाली उतरतात... अंधारामुळे बसच्या डाव्या बाजुचे पुढील चाक गटारात अडकले असावे, असे वाटते. पण काही क्षणात हा भ्रम दुर होतो... बसचे चाक निखळून काही फुट अंतरावर पडलेले दिसते अन् सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो... सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.


पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) खिळखिळ्या बस शहरातील विविध रस्त्यांवर बंद पडल्याचे दृश्य रोजच दिसते. तर महिन्यातून एखाद्यादिवशी बसला आग लागल्याची बातमी कानावर पडत पडते. कधी छोटे-मोठे अपघातही होतात. यावर कडी करणारा प्रकार मंगळवारी (दि. ३०) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला. त्यामुळे पीएमपीच्या बसच्या विदारक स्थितीचे वास्तव समोर आले आहे. ह्यपीएमपीह्णच्या कात्रज आगाराची बस (एमएच १२ सीटी १७८१) नेहमीप्रमाणे पॉवर हाऊस चौकातून नेहरू रस्त्याने रामोशी गेटच्या दिशेने निघाली होती. ही बस हौसिंग बोर्ड ते कात्रज (मार्ग क्र.२४) या मार्गावर धावते. यादिवशी चौकातून बस काही अंतरावर पुढे गेल्यानंतर मोठा आवाज होऊन बस डाव्या बाजुला झुकते. बसचा वेग कमी असल्याने बस जागेवर उभी राहते. 
प्रवाशांसह चालक व वाहक तातडीने बसमधून खाली उतरतात. बसचे डाव्या बाजूचे पुढील चाक अ?ॅक्सल तुटल्याने निखळल्याचे दिसून आले. त्यामुळे निखळलेले चाक काही अंतरावर रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या दुचाकीला धडकले होते. रात्रीची वेळ असल्याने बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते. यावेळी पाऊसही सुरू होता. त्यामुळे रस्त्यावरही फारशी वर्दळी नव्हती. परिणामी, मोठी दुर्घटना झाली नाही. तसेच बसमधील प्रवाशांनाही कसली दुखापत झाली नाही. पण निखळलेले चाक पाहून सर्वच जण घाबरून गेले होते. प्रत्यक्षदर्शी देवेंद्रकुमार ठक्कर यांनी ह्यलोकमतह्णला याबाबतची माहिती दिली.  
............
बसचे चाक अ‍ॅक्सलपासून तुटले होते. या रस्त्यावर नेहमी मोठी गर्दी असते. अपघातावेळी सुदैवाने परिसरात कुणीही नसल्याने मोठा अपघात टळला. एका स्कुटरला चाक धडकल्याने फारसे दुरवर गेले नाही. बसचा वेगही कमी होता. अपघात झाल्यानंतर काही वेळापर्यंत बसचे इंजिन सुरूच होते. पोलिसांनी बस बाजुला करेपर्यंत रस्ताय बंद केल्याने वाहतूककोंडी झाली होती.
- देवेंद्रकुमार ठक्कर, 
..........
प्रत्यक्षदर्शीबसचे चाक निघळल्याने अपघात झाला आहे. यामागचे नेमके कारण शोधण्याचे काम अपघात विभागाकडून सुरू आहे. देखभाल दुरूस्तीतील त्रुटी असू शकतात, असा प्राथमिक अंदाज आहे. ही बस जुनी व पीएमपीच्या मालकीची आहे.
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

Web Title: When the wheel of a running bus breaks down ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.