अपघातांची मालिका कधी थांबणार

By admin | Published: December 20, 2014 11:56 PM2014-12-20T23:56:51+5:302014-12-20T23:56:51+5:30

गेल्या काही वर्षांपासून असा एकही महिना गेला नाही, की नवीन कात्रज बाह्यवळण मार्गावर मोठा अपघातच झाला नाही.

When will the series of accidents stop | अपघातांची मालिका कधी थांबणार

अपघातांची मालिका कधी थांबणार

Next

दत्तात्रय जोरकर/सचिन सिंह ल्ल खडकवासला
खडकवासला : गेल्या काही वर्षांपासून असा एकही महिना गेला नाही, की नवीन कात्रज बाह्यवळण मार्गावर मोठा अपघातच झाला नाही. दोन दिवसांपूर्वी नवीन बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आणि पुन्हा एकदा या रस्त्याबाबत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
येथील दरीपूल संपताच नऱ्हेपर्यंत वेगाने येणाऱ्या जड वाहनांवर ताबा मिळविणे वाहनचालकांना अवघड जाते. या बाह्यवळण मार्गावर सर्वात जास्त अपघात हे कंटेनर व जड वाहनांचे होत असतानाच आता हलक्या मोटारींची भर पडत चालली आहे. कंटेनर जांभूळवाडीच्या दिशेने वडगाव बु. नवले लॉन्स येथे उताराने येत असतानाच बहुतांश अपघात झालेले असतानाही वाहनचालक याचा कोणताही बोध घेत नाहीत. अनेक वाहनचालक वाहने बंद करून इंधन वाचविण्याचा प्रयत्न करतात असे दिसून येते. महामार्गावरील आंबेगाव खुर्द पुलाच्या खालील भागात रस्ता खूपच खराब झाला आहे. नऱ्हे, आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी गावांच्या हद्दीला जोडणाऱ्या भागात जागोजागी डिव्हायडर्स तोडण्याचा खटाटोप स्थानिकांनी केल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

४पुलाचे संथ गतीने चालले काम सेवा रस्त्याचा रेंगाळलेला प्रश्न व दुभाजक ओलांडून तसेच नियम धुडकावून सुरूअसलेली वाहतूक याचा विचार करता येथील अपघातांची परिस्थिती बदलणे अवघड झाले आहे. याच रस्त्यावर जागोजागी गावात जाणारी वाहनेही उलट दिशेने येत असतात. खाणीतून खडी, डबर, इतर जाणारी वाहने, रेडीमिक्स वाहने; तर जागोजागी आजही उलट दिशेने जाऊन अंतर वाचविण्याचे दृश्य सतत दिसते. काही ठिकाणी तर रस्त्याची नव्याने सुधारणा करूनही कामाचा दर्जा आता आपला रंग दाखवू लागला.

आकार हेच अपघाताचे कारण
४कात्रज नवीन बोगदा सोडला, की लागतो तो तीव्र उतार. हा उताराचा धोकादायक रस्ता व त्यातच जागोजागी नकळत येणारी वळणे आणि काही अंतर पुढे जाताच अवघड असा उंच दरीपूल. हा एस आकाराचा दरीपूल व त्याची रचनाच या अपघातांचे खरे कारण आहे की काय असे वाटू लागले आहे.
४नव्याने हॉटेल व्यवसाय करणारांनी याच मार्गावरील पंक्चर तोडून सरळ सरळ अपघाताला निमंत्रण मिळेल अशा पद्धतीने जागोजागी जागा केल्याने हा रस्ता अपघाताला कारणीभूत ठरत आहे.

Web Title: When will the series of accidents stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.