सिग्नल यंत्रणा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:07 AM2017-08-01T04:07:02+5:302017-08-01T04:07:02+5:30

नागरिकांना प्रवास करताना जीवघेणा ठरत असलेल्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या बाणेर परिसरातील राधा चौकात बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी महापालिका व वाहतूक विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.

When will the signal system begin? | सिग्नल यंत्रणा कधी सुरू होणार?

सिग्नल यंत्रणा कधी सुरू होणार?

Next

बाणेर : नागरिकांना प्रवास करताना जीवघेणा ठरत असलेल्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या बाणेर परिसरातील राधा चौकात बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी महापालिका व वाहतूक विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
दिवसभरात हजारो वाहनांची ये-जा सुरू असलेल्या या चौकात सिग्नल उभारण्यात आले असले, तरी केवळ पिवळा दिवा लुकलुकत असल्याने नागरिक संभ्रमावस्थेत प्रवास करीत आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाºया चौकात सिग्नल सुरू करण्यास पालिका व वाहतूक विभागातर्फे विलंब केला जात असल्याने या चौकातून नियमित प्रवास करणाºया नागरिकांकडून कमालीचा असंतोष व्यक्त केला जात आहे.
लाखो रुपये खर्च करून राधा चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत; मात्र हे वाहतूक नियंत्रक दिवे केवळ शोभेची वस्तू झाली आहे. परिणामी, छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. मुंबई-बंगळुरू या द्रुतगती मार्गावरील राधा चौकात बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, पाषाण या ठिकाणी ये-जा करण्यासाठी चार प्रशस्त रस्ते आहेत. या महामार्गाच्या बाजूलाच नागरिकांना प्रवासासाठी सेवारस्त्यांची सुविधा आहे.
अनेक वर्षांपासून या चौकात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली; मात्र अनेक महिने उलटूनही अद्याप सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होऊ शकलेली नाही. त्यामुळे अजूनही वाहनचालक इतर वाहनांचा अंदाज घेत प्रवास करत आहेत. त्यामुळे पालिका व वाहतूक विभागाने गांभीर्याने या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर येथील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी नागरिक-वाहनचालकांकडून केली जात आहे.

Web Title: When will the signal system begin?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.