पोलिस ॲक्शन मोडमध्ये येणार कधी? पुण्याची संस्कृती बिघडू देऊ नका- मेधा कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 10:11 AM2024-06-25T10:11:03+5:302024-06-25T10:11:59+5:30

पुणे : शहरामध्ये सुरू असलेले गैरप्रकारांचे सत्र आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. संबंधित बारच्या ...

When will the police come into action mode? Don't let the culture of Pune spoil - Medha Kulkarni | पोलिस ॲक्शन मोडमध्ये येणार कधी? पुण्याची संस्कृती बिघडू देऊ नका- मेधा कुलकर्णी

पोलिस ॲक्शन मोडमध्ये येणार कधी? पुण्याची संस्कृती बिघडू देऊ नका- मेधा कुलकर्णी

पुणे : शहरामध्ये सुरू असलेले गैरप्रकारांचे सत्र आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. संबंधित बारच्या मालकावर, चालकावर आणि अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. काही पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन शहरांमधील सर्व अवैध गोष्टींना आळा घालावा, अशी मागणी भाजपच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.

पुण्याची सांस्कृतिक ओळख कुठल्याही पद्धतीने बदलू दिली जाणार नाही. गैरबाबी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही त्वरित आणि कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. विरोधी पक्षाच्या आरोपांबद्दलच बोलायचे तर यापूर्वीही काँग्रेसच्या एका आमदाराने आणि विरोधी पक्षाच्या एका महिला पदाधिकारी यांनी यापूर्वी जे आरोप केले होते, त्याचा त्यांनी काय पाठपुरावा केला? एक्साइज खात्यातील अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांच्या बद्दल त्या आरोपांचे काय झाले, याची चौकशी झाली पाहिजे. आता ते गप्प का, अशा प्रकारचा प्रश्न जनता उपस्थित करीत आहे. त्यांनी जे आरोप केले होते त्या पोलिस अधिकाऱ्यांची आणि एक्साइज अधिकाऱ्यांची चौकशी करून ते जर दोषी असतील तर अशा दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी आणि जर ते दोषी नसतील तर खोटे आरोप केल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.

Web Title: When will the police come into action mode? Don't let the culture of Pune spoil - Medha Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.