दौंड शहरातील वाहतूककोंडी कधी सुटणार
By admin | Published: December 4, 2014 05:00 AM2014-12-04T05:00:22+5:302014-12-04T05:00:22+5:30
शहरात वाहतूककोंडीची समस्या ही नित्याचीच झाली आहे. त्यात पोलिसांचे ढिसाळ नियोजन. यामुळे ही समस्या वाढत आहे.
दौंड : शहरात वाहतूककोंडीची समस्या ही नित्याचीच झाली आहे. त्यात पोलिसांचे ढिसाळ नियोजन. यामुळे
ही समस्या वाढत आहे. शहरातील मुख्य रस्ता आणि रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ सतत वाहतूककोंडी
होत असते.
रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ नवी आणि जुनी अशा दोन मोऱ्या आहेत. मोठ्या वाहनांसाठी मोठ्या मोरीतून मार्ग असताना ती वाहन छोट्या मोरीतून जातात आणि ती मोरीत अडकतात. परिणामी, वाहतूक विस्कळीत होते.
शाळा सुटल्यानंतर या दोन्ही मोरींच्या परिसरात तर वाहनांचा चक्काजामच असतो. नागरिक ही कोंडी सोडविण्यकासाठी पुढाकार घेतात; मात्र पोलिसांचा पत्ताच नसतो.
हीच परिस्थिती शहरातील मुख्य रस्त्यावर असते. येथून श्रीक्षेत्र सिद्धटेकला जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. त्यामुळे मोठी प्रवासी वाहने येथून जातात. त्यातच ऊस वाहतूक, रस्त्याच्या आजूबाजूला अस्ताव्यस्त लावलेली दुचाकी वाहने, तर काही व्यापाऱ्यांचे अतिक्रमण यामुळे येथेही नेहमीच वाहतूककोंडी असते. (वार्ताहर)