पाण्याचा प्रश्न कधी सुटणार? : मोरे
By admin | Published: May 14, 2016 12:31 AM2016-05-14T00:31:22+5:302016-05-14T00:31:22+5:30
दौंडच्या प्रशासकीय इमारतीत जनतेला पिण्यासाठी पाणी नाही. या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावे, तर भोईटेनगरमध्ये मुख्य रस्त्यावर पाच ते सात पथदिवे रस्त्याच्या मधोमध आहेत.
दौंड : दौंडच्या प्रशासकीय इमारतीत जनतेला पिण्यासाठी पाणी नाही. या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावे, तर भोईटेनगरमध्ये मुख्य रस्त्यावर पाच ते सात पथदिवे रस्त्याच्या मधोमध आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतोय, असे सवाल नागरिकांनी उपस्थित केले. निमित्त होत, दौंडमध्ये झालेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ या मोहिमेचे.नव्याने रस्ता करायचा ठरला, तर या विद्युतखांबाचा अडथळा निर्माण होऊ शकतो, असे प्रश्न नगरसेविका शीतल मोरे यांनी उपस्थित केल्यानंतर त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नायब तहसीलदार प्रशांत बेडसे म्हणाले, की प्रशासकीय इमारतीत योग्य त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर विद्युत महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एम. एन. डोंबाळे म्हणाले, की पथदिवे बाजूला करण्याचे कामकाज हे विद्युत महावितरणाचे नसून ही जबाबदारी नगरपरिषदेची आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी
४दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी तालुक्यातील समस्यांचा आढावा घेतला. या आढावांतर्गत विविध समस्या त्यांनी मांडल्या. यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी समर्पकपणे उत्तरे दिली. दरम्यान लोकमतने असा सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबवून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे अप्पासाहेब पवार यांनी स्पष्ट केले.बंद टोलनाका
उद्ध्वस्त करावा
४दौंड केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष झावरे यांनी बंद झालेल्या टोलनाक्याचा प्रश्न उपस्थित करून सध्याच्या परिस्थितीत टोलनाके बंद अवस्थेत आहेत. नगर मोरीजवळील टोलनाका तोडण्यात यावा, नाही तर या टोलनाक्यात अवैध धंदे सुरू होतील. मात्र टोलनाक्याच्या संदर्भात उत्तर न मिळाल्याने सदरचा प्रश्न अनुत्तरित राहिला. मात्र, जनतेच्या हितासाठी बंद असलेले टोलनाके उद्ध्वस्त केले पाहिजेत, असा सूर उपस्थित नागरिकांमध्ये होता.