आम्हाला दुसरा डोस कधी मिळणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:32+5:302021-05-23T04:09:32+5:30
प्राथमिक आरोग्य केेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव व रूपाली बंगाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ मार्च ते १२ ...
प्राथमिक आरोग्य केेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव व रूपाली बंगाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ मार्च ते १२ मे या कालावधीत एकूण १३ हजार ८७३ जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी, रक्तदाब व शुगर आदी आजार असलेल्यांसमवेत ४५ वर्षांवरील ११ हजार ६५४ जणांना पहिला २ हजार २२८ जणांना दुसरा तर १८ ते ४५ वयोगटातील ६३६ जणांचा समवेश आहे. शासनाच्या मार्गदर्शक निर्देशानुसार ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे या आरोग्य केेंद्रात २८ मेनंतर दुसरा डोस देण्यास सुरुवात होणार आहे. कोरोना लसीकरण होत नसल्याने लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केेंद्रात नागरिक फिरकत नसल्याने इतर दिवसांच्या मानाने सध्या गर्दीचे प्रमाण कमी झाले आहे.
आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव म्हणाले,कोविड लस घेतल्यावर तुम्हाला कोरोना होणार नाही असे नाही. परंतु, शक्यता कमी आहे. लस घेतल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागतात. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लस कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमधील अंश घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर १२ ते १६ आठवडेनंतर दुसरा डोस घ्यावा, यामागे शास्त्रीय कारण आहे. पहिला डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती शरीरात निर्माण होण्यास सुरुवात होते. यानंतर दुसरा डोस घेतल्यानंतर मेमरी सेल अधिक बलशाली होतात. कोरोनापासून बचाव होण्यास मदत होते.
कोरोना लसीकरण होत नसल्याने लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केेंद्रात नागरिक फिरकत नसल्याने गर्दी कमी दिसते.