म्युकरमायकोसिसचे उपचार कुठे मिळतील? वीकेंडला लोणावळ्याला जाऊ शकतो का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:17+5:302021-06-23T04:08:17+5:30
रुग्णसंख्या कमी : हेल्पलाईनवरील फोन काॅल्सही झाले कमी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : म्युकरमायकोसिस रुग्णाला कुठे उपचार मिळतील...हाॅस्पिटलने खूप ...
रुग्णसंख्या कमी : हेल्पलाईनवरील फोन काॅल्सही झाले कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : म्युकरमायकोसिस रुग्णाला कुठे उपचार मिळतील...हाॅस्पिटलने खूप बिल लावले...कमी होईल का...रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळत नाही...रुग्णवाहिका मिळत नाही आदीसह नाशिकला जायचे एसटी बस सुरू झाल्या का...वीकेंडला लोणावळ्याला जाऊ शकतो का? असे एक ना अनेक प्रश्न जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर लोक फोन करून विचारत आहेत. परंतु आता रुग्णसंख्या कमी झाल्याने हेल्पलाईनवर येणारे फोन काॅल्स देखील कमी झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषदेसह प्रत्येक तालुकाच्या ठिकाणी कोरोना रुग्ण, रुग्णांचे नातेवाईकांना मदत करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागरिकांना अनेक प्रश्न, अनेक अडचणी असल्याने हेल्पलाईनचे फोन सतत खणखणत होते. यामुळेच पहिल्या लाटेत तब्बल अडीच हजारपेक्षा अधिक लोकांनी हेल्पलाईनवर फोन करून आपल्या समस्या, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 1686 लोकांनी हेल्पलाईनवर फोन केले आहे. परंतु आता रुग्णसंख्या कमी झाल्याने फोनची संख्या देखील कमी झाली आहे.
-------
तारीख कॉल्स रुग्ण
१ मे : ३२ : ९९१८
१५ मे : १६ : ५३६१
३० मे : २१ : २२२४
१५ जून : ११४२
२० जून : ० : ११३२
चौकट
-पहिल्या लाटेनंतर आलेले एकूण कॉल्स - २३५६
-दुसऱ्या लाटेत आलेले कॉल्स - १६८६
----
रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळेल का? पासून लोणावळ्याला जाता येईल का?
म्युकरमायकोसिस रुग्णाला कुठे उपचार मिळतील... हाॅस्पिटलने खूप बिल लावले... कमी होईल का... रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळत नाही...रुग्णवाहिका मिळत नाही आदीसह नाशिकला जायचे एसटी बस सुरू झाल्या का... वीकेंडला लोणावळ्याला जाऊ शकतो का... कारवाई होईल का.. असे एक ना अनेक प्रश्न जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या हेल्पलाईनवर विचारत आहेत. आता दिवसाला एकदोन ही फोन काॅल्स येत नाहीत.
-------