काम पूर्ण केले नाही तर पैसे गेले कोठे? फ्लॅटधारकांचा डीएसकेंना सवाल; फायनान्स कंपनीकडून कायदेशीर नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 03:02 AM2017-11-26T03:02:46+5:302017-11-26T03:03:07+5:30

फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी २००हून अधिक फ्लॅटधारकांनी शनिवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत गर्दी केली होती.

Where did the money go if the work was not done? Flatholders DSKenna question; Legal Notices from Finance Company | काम पूर्ण केले नाही तर पैसे गेले कोठे? फ्लॅटधारकांचा डीएसकेंना सवाल; फायनान्स कंपनीकडून कायदेशीर नोटिसा

काम पूर्ण केले नाही तर पैसे गेले कोठे? फ्लॅटधारकांचा डीएसकेंना सवाल; फायनान्स कंपनीकडून कायदेशीर नोटिसा

googlenewsNext

पुणे : फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी २००हून अधिक फ्लॅटधारकांनी शनिवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत गर्दी केली होती़ डीएसके यांनी आमच्या इमारतीचे काम पूर्ण केले नाही, तर ते पैसे गेले कोठे, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत़ दरम्यान, डीएसके यांच्याकडे फ्लॅट घेताना कर्ज घेतलेल्यांना टाटा फायनान्स कॅपिटल हाउसिंग फायनान्स कंपनीने कायदेशीर नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे़
आनंदघन या प्रकल्पात ४५० फ्लॅट असून त्याचा ताबा डिसेंबर २०१६ मध्ये देणार होते. पण मुदत उलटून एक वर्षानंतरही ताबा मिळालेला नाही. इमारतीचे काम अजूनही अपूर्ण आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे पुन्हा कामास सुरुवातही केलेली नाही. कधीपर्यंत ताबा देणार, हेही सांगत नसल्याने तक्रार देण्याचा निर्णय फ्लॅटधारकांनी घेतला. प्रकल्पातील फ्लॅटधारकांनी तक्रारी दिल्या आहेत.
पोलिसांनी स्वतंत्र फॉर्मच तयार केला आहे़ डीएसके यांच्या तीन प्रकारच्या स्कीम आहेत़ त्यात वैयक्तिक कर्ज घेऊन खरेदी केलेला फ्लॅट, अन्य फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन घेतलेला फ्लॅट आणि आधी घर, पैसे नंतर या स्कीमनुसार तक्रारी घेतल्या जात आहेत.

ना घर का ना घाटका
डीएसके यांच्या ‘आधी घर पैसे नंतर’ या योजनेनुसार फ्लॅट बुक केलेल्यांना डिसेंबर २०१६मध्ये ताबा मिळणार होता़ त्यानंतर कर्जाचा मासिक हप्ता सुरू होणार होता़ तोपर्यंतचा हप्ता डीएसके भरणार होते़ त्यांनी तो न भरल्याने फायनान्स कंपन्यांनी फ्लॅटधारकांच्या खात्याला अ‍ॅटॅचमेंट लावली आहे़ त्यांनी आगाऊ दिलेले धनादेश बँकेत भरले़

ते न वटल्याने त्यांना आता कायदेशीर नोटिसा येऊ लागल्या आहेत़ त्यांच्या खात्यातून चेक न वटता परत गेल्याने ते डिफॉल्टर ठरल्याने त्यांचे क्रेडिट रेटिंग कमी झाले आहे़ आता त्यांना दुसºया कोणत्याही कामासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते त्यासाठी अपात्र ठरू लागले आहेत़

Web Title: Where did the money go if the work was not done? Flatholders DSKenna question; Legal Notices from Finance Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.