कुठं नेऊन ठेवलंय आमचं सायकलींचं शहर...?

By admin | Published: November 4, 2014 03:50 AM2014-11-04T03:50:35+5:302014-11-04T03:50:35+5:30

बहुतांशी ट्रॅक नादुरुस्त असून, अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकवर अतिक्रमणांचा विळखा आहे. एकेकाळी पर्यावरणपूरक असलेले सायकलींचे शहर कुठे नेऊन ठेवलंय

Where did we go ... our bicycle town ...? | कुठं नेऊन ठेवलंय आमचं सायकलींचं शहर...?

कुठं नेऊन ठेवलंय आमचं सायकलींचं शहर...?

Next

पुणे : सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रशासनाने केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी विकास (जेएनएनयूआरएम) योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून रस्ता रुंदीकरणात उभारलेले सायकल ट्रॅक कागदावरच उरले आहेत. बहुतांशी ट्रॅक नादुरुस्त असून, अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकवर अतिक्रमणांचा विळखा आहे. एकेकाळी पर्यावरणपूरक असलेले सायकलींचे शहर कुठे नेऊन ठेवलंय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात जवळपास अर्ध्याहून अधिक सायकल ट्रॅक अतिक्रमणांच्या विळख्यात असताना, दरवर्षी त्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यापलीकडे महापालिका सायकल वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी मात्र, काहीच करताना दिसत नाही. शहरात बीआरटी प्रकल्प राबविण्यासाठी सुमारे ३९ रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार १२६ किलोमीटरचे सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार होते. रुंदीकरणातील १0४ किलोमीटरचे ट्रॅक पूर्ण झाले आहेत. त्यातील केवळ १० ते १२ किलोमीटरचेच ट्रॅक वापरण्यालायक आहेत. शहरातील स्वारगेट ते हडपसर, स्वारगेट ते कात्रज, नगर रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता या काही प्रमुख रस्त्यांवरील सायकल ट्रॅकची मोठी दुरवस्था झालेली आहे. स्वारगेट ते कात्रज , हडपसर ते स्वारगेट ते कात्रज या मार्गावरील सायकल ट्रॅकची सुरुवात अतिक्रमणांच्या विळख्याने होते. तसेच अनेक ठिकाणी पथारी व्यवासायिक व दुकान व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेले आहे. एवढेच काय कमी म्हणून महापालिकेच्या कचराकुंड्याही सायकल ट्रॅकवर थाटण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सायकल ट्रॅक शोधण्याची वेळ सायकलस्वारांवर येत असल्याचे चित्र आहे. हडपसर परिसरातील सायकल ट्रॅक ही अतिक्रमणांच्या विळख्यातच आहे. कर्वे रस्ता, कर्वे रस्त्यवारील सायकल ट्रॅकची सुरुवात पार्किंगनेच होते. हा सायकल ट्रॅकही सलग नाही. त्यामुळे अनेकदा नागरिकांना मुख्य रस्त्याचा आधार घ्यावा लागतो, तर काही ठिकाणी सायकल ट्रॅकची दुरवस्था झाली असून, या मार्गावरील अनेक व्यावसायिकांनी त्यावर अतिक्रमण केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Where did we go ... our bicycle town ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.