जेधे फाउंडेशनच्या वतीने कोविड सेंटरमध्ये अन्न सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:21+5:302021-05-13T04:11:21+5:30

पारगाव येथील जेधे फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय सर्जेराव जेधे यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. नाश्त्यामध्ये दूध, अंडी, बिस्किटे यांचा ...

Where food services at the Covid Center on behalf of the Foundation | जेधे फाउंडेशनच्या वतीने कोविड सेंटरमध्ये अन्न सेवा

जेधे फाउंडेशनच्या वतीने कोविड सेंटरमध्ये अन्न सेवा

Next

पारगाव येथील जेधे फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय सर्जेराव जेधे यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. नाश्त्यामध्ये दूध, अंडी, बिस्किटे यांचा समावेश असतो. तर दुपारचे पोटभर जेवण या फाउंडेशनच्या वतीने दिले जाते. दररोज परिसरातील ७९ रुग्ण व स्वयंसेवक या सुविधेचा लाभ घेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ही सुविधा चालू झाली आहे.

विशेष म्हणजे, भोजनाची पार्सल रुग्ण व कर्मचारी यांना वेळेवर मिळावीत यासाठी 'पारगाव मोबाईल शॅापी असोसिएशन'ने उत्स्फूर्त पुढाकार घेतला आहे. भोजन पार्सल पोहोचवण्याची जबाबदारी मोबाईल शॅापी दुकानदारांनी आपापसात आळीपाळीने वाटून घेतली आहे. याकामी प्रकाश गोलांडे (पारगाव) व प्रशांत मुथा (केडगाव) या मित्रांच्या पुढाकारामुळेच हे शक्य झाले.

दिग्विजय जेधे म्हणाले की,

संकटाच्या काळात समाजातील सारे लोक आपोआप एकत्र येतात आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सेवाकार्य करतात. ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे. चला, आपण सारे असेच एकजूट होऊन परस्परांना धीर देऊ. अंधार वाढला आहे, आपण सेवेची आशेची एक ज्योत प्रज्वलित करू.

Web Title: Where food services at the Covid Center on behalf of the Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.