रेल्वेची चौकशी करायची तरी कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:15 AM2021-08-14T04:15:45+5:302021-08-14T04:15:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांना गाड्यांची चौकशी करण्याआधी चौकशीची खिडकी कुठे आहे? याचीच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांना गाड्यांची चौकशी करण्याआधी चौकशीची खिडकी कुठे आहे? याचीच चौकशी करावी लागत आहे. कारण मुख्य प्रवेशद्वारापासून ही खिडकी काही अंतर दूर आहे. शिवाय ती सहज दिसत नाही. बुकिंग कार्यालयात ही खिडकी असून, प्रवाशांना त्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
प्रवासी स्थानकांवर दाखल झाल्यानंतर त्यांना संबंधित गाडी कधी येणार आहे, कोणत्या फलाटावर येणे आहे, त्याच्या डब्यांची क्रमवारी कशी असेल, यासह डॉरमेटरी, रिटायरिंग रूम, तिकीट कन्फर्म झाल आहे का?, कनेक्टिंग रेल्वे आदी बाबतची माहिती प्रवाशांना हवी असते. ती त्यांना मिळविण्यासाठी बुकिंग कार्यालय येथे जावे लागते.
बॉक्स १ प्रवेशद्वराजवळ असेल तर ...
पुणे स्थानकांच्या प्रवेशद्वारा जवळ चौकशी खिडकी असेल, तर प्रवाशांची चांगली सोय होईल. यासाठी जागा देखील उपलब्ध आहे. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्लॅटफॉर्म तिकीट खिडकी जवळची जागा रिकामीच आहे. त्या जवळ जर चौकशीची खिडकी केली तर प्रवाशांची धावाधाव वाचेल. तसेच त्यांच्या वेळेचीही बचत होईल.
कोट १
बुकिंग कार्यालयातील जागा प्रवाशांच्या दृष्टीने सोयीची आहे. म्हणून ती निवडण्यात आली. या संदर्भात कोणत्याही प्रवाशांनी तक्रार केली नाही अथवा खिडकीची जागा बदलावी, अशी मागणी करण्यात आली नाही.
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे
कोट २
प्रवाशांना जी माहिती तत्काळ मिळणे आवश्यक आहे, ती मिळविण्यासाठी त्यांना फिरावे लागते. शिवाय ती माहिती कुठे मिळेल त्याची देखील त्यांना कल्पना नसते. कुणाला तरी विचारूनच बुकिंग कार्यालय गाठावे लागते. त्यामुळे प्रवाशांना चटकन माहिती मिळेल अशा ठिकाणी चौकशीची खिडकी असावी. या संदर्भात डीआरएम यांच्याकडे मागणी करणार आहे.
निखिल काची, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, पुणे