दोषारोप पत्र लवकर पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना महिला हवालदाराला रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 11:46 PM2021-01-14T23:46:50+5:302021-01-14T23:47:07+5:30

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला.

While accepting a bribe of Rs 5,000 for sending the charge sheet early, the female constable was caught red handed | दोषारोप पत्र लवकर पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना महिला हवालदाराला रंगेहाथ पकडले

दोषारोप पत्र लवकर पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना महिला हवालदाराला रंगेहाथ पकडले

Next

पुणे : तक्रारदाराच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महिला हवालदाराला रंगेहाथ पकडले.

श्रद्धा शरद अकोलकर (वय ३५) असे त्यांचे नाव आहे. अकोलकर या सध्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या भावाच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचे दोषारोप पत्र (चार्जशिट) लवकर पाठविण्यासाठी अकोलकर यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर त्याची पडताळणी १३ व १४ जानेवारी रोजी करण्यात आली. त्यात अकोलकर यांनी तडजोड करुन ५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून ५ हजार रुपये स्वीकारताना श्रद्धा अकोलकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अलका सरग अधिक तपास करीत आहेत.

Web Title: While accepting a bribe of Rs 5,000 for sending the charge sheet early, the female constable was caught red handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.