Devendra Fadnavis: मोदींच्या नेतृत्वात देश पुढे चाललाय, तर महाराष्ट्र सरकार वसुली करण्यात दंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 09:26 PM2021-12-03T21:26:29+5:302021-12-03T21:27:01+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात महापालिका निवडणूक, विरोधी पक्षांवर टीका, याबाबरोबरच मोदींचे कौतुक अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
पुणे : पुणे महानगरपालिकेजवळ भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच भाजपच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. संपूर्ण शहरातून कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करत कार्यक्रमासही आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक, विरोधी पक्षांवर टीका, याबाबरोबरच मोदींचे कौतुक अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
फडणवीस म्हणाले, आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे चालला आहे. तर महाराष्ट्र सरकार वसुली करण्यात गुंग झाले आहेत. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर वसुली सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि कार्यकर्तेच खंडणी वसूल करण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
''मोदींच्या नेतृत्वाखाली वॅक्सिन तयार झाले नसते तर काय झाले असते? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, मोदींनी सर्व वैज्ञानिकांना सोबत घेऊन, कंपन्यांना ऍडवान्समध्ये पैसे दिले. आणि वॅक्सिन तयार केली. दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने आम्ही इतके डोस दिले म्हणून सांगत होते, पण हे सर्व डोस त्यांना मोदींनी दिले असल्याचे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.''
पुण्यात शिवसेना नावालाही उरली नाही.
पुण्यात शिवसेना नावालाही उरली नाही. भाजपने पुढच्या 25 वर्षाचा विचार करून त्यादृष्टीने विकासकामे केली आहेत. आमचे पुणेकरांना वचन आहे, जर पुन्हा सत्ता आली तर पुण्याला देशात प्रथम क्रमांकाच केल्याशिवाय राहणार नाही. असा असे वचन त्यांनी पुणेकरांना दिले आहे.